रानू मंडल यांनी गायलेलं ”तेरी मेरी’ हे गाणं प्रदर्शित झालं तुम्ही पाहिलंत का?

रानू मंडल यांना सोशल मीडिया ने चमत्कारीक पणे एका रात्री मध्ये स्टार बनवले. रानू मंडल मंडल यांनी आपल्या आयुष्याची 10 वर्ष कठीण परिस्थिती मध्ये घालवली पण शेवटी त्यांचे नशीब पालटले आणि त्यांच्यावर रुसलेलं त्यांचं नशीब असं काही मेहरबान झालं की रातोरात त्यांनी ज्याची कल्पना देखील नसेल केली ते सगळं दिलं.

सोशल मीडिया युजर्सनी अफाट प्रेम देऊन रानू मंडल यांना थेट बॉलीवूड गायक बनवलं. हिमेश रेशमिया यांनी तिच्या कडून अनेक गाणी गाऊन घेतली आहे. रानू मंडलच्या जीवनामध्ये हे सोनेरी दिवस हिमेश रेशमिया मुळेच आला असे बोलल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण असे हजारो गायक आणि गायिका रोज सोशल मीडिया वर आपले व्हिडीओ अपलोड करत असतात तसेच रियालिटी शो मध्ये देखील अनेक लोक भाग घेतात पण त्यांच्या सगळ्यांच्याच नशिबी बॉलिवूड फिल्मसाठी गाणं रेकॉर्डिंग करणे नसत.

हल्लीच रानू मंडल यांचं ”तेरी मेरी’ हे गाणं लोकांनी भरपूर पसंत केलं होत. त्यांचं हे गाणं आता रिलीज झालं आहे. ”तेरी मेरी’ या गाण्यामुळे रानू मंडल यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळाले. अगदी काही दिवसा पूर्वी रिलीज झालेलं रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांचं हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे कि त्याने युट्युब वर 5 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवल्या आहेत.

काही दिवसा पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा रानू मंडल रेल्वे स्टेशन वर गाणं गाऊन आपलं पोट भरत होती. पण त्यांच्या जादुई आवाजाने त्यांना आज बॉलिवूड सिंगर बनवलं आहे.

रानू मंडल यांना बॉलिवूड फिल्म सोबतच आता साऊथ फिल्म्स मधून देखील ऑफर मिळत आहेत. सध्या त्या त्यांच्या आयुष्यातील आता पर्यंतचा सर्वात चांगला काळ उपभोगत आहेत.