रानू मंडल ने दिवाळीला पुन्हा गायले गाणे, जबरदस्त वायरल झाला व्हिडीओ

रानू मंडल (Ranu Mondal) हे नाव तुमच्या लक्षात असेलच. होय, रानू मंडल ही एका रेल्वे स्टेशन वर गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी महिला आहे जी एका रात्रीत इंटरनेटवर सोशल मीडिया स्टार झाली होती. तिने रेल्वे स्टेशन वर लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा’ हे आपल्या आवाजात गायले होते आणि ते प्रचंड वायरल झाले होते.

ज्यानंतर हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याने तिला बॉलिवूड मध्ये ब्रेक दिला होता आणि आपल्या एका फिल्मसाठी तिच्या कडून काही गाणी रेकॉर्डिंग करून घेतली होती. पण हिमेशच्या फिल्म मध्ये गाणे गायल्या नंतर रानू काही दिवसा पासून गायब झाली होती म्हणजेच प्रकाशझोतात नव्हती.

पण आता पुन्हा एकदा ती इंटरनेटवर वायरल झाली आहे. हल्लीच रानू ने दिवाळी (Diwali) निमित्त पुन्हा एकदा गाणे गायले आहे. तिचा लेटेस्ट व्हिडीओ इंटरनेट वर जबरदस्त वेगाने वायरल होत आहे.

खरंतर हल्लीच रानू मंडल एका बांग्ला टीव्ही शो मध्ये ज्याचे नाव ‘कॉमेडी स्टार्स’ आहे यामध्ये गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. या शो मध्ये सगळ्यांच्या रिक्वेस्ट वर तिने एक गाणे गायले आहे. तिने दिवाळीला येणाऱ्या या एपिसोड मध्ये शाहरुख आणि काजोल वर चित्रित झालेलं गाणं ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणे आपल्या आवाजात गायले.

रानू चा आवाज ऐकून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत. तिच्या गाण्यावर भरपूर टाळयांचा वर्षाव झाला. रानू मंडलच्या गाण्याचा व्हिडीओ डेली हंट च्या ऑफिशियल पेज वर शेयर केला गेला आहे. ज्याला भरपूर व्ह्यूज मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

🎤 Ranu mandal, 🎬 Hero . . . #هند #ranumondal #رانو_موندال

A post shared by Bollywood Cinema News (@bollycinenews) on

या व्हिडीओ मध्ये रानू मंडल एकदम वेगळी दिसून  येत आहे.तिने व्हाईट, यलो आणि ग्रीन या कॉम्बिनेशनची साडी परिधान केली आहे आणि डोळ्यात काजळ लावले आहे. रानूचा हा लूक आणि अंदाज लोकांना आवडत आहे.

आपल्या माहितीसाठी रानू ने हिमेश रेशमियाची फिल्म ‘हैप्पी हार्डी और हिर’ साठी ”तेरी मेरी कहाणी’ हे गाणे गायले होते ज्याचा व्हिडीओ देखील लोकांच्या पसंतीस आला होता. रानू ने हिमेशच्या या फिल्मसाठी एकूण तीन गाणी रिकॉर्ड केली आहेत.

रानू मंडल पहिले पश्चिम बंगाल मधील राणाघाट मधील गल्लीबोळात आणि रेल्वे स्टेशन वर फिरून गाणे गात होती आणि त्या बदल्यात तिला जे काही मिळत असे त्यावर ती आपले दिवस काढत होती. एक दिवस अतीन्द्र चक्रवर्ती नावाच्या एका व्यक्तीने तिचा व्हिडीओ काढला आणि त्यास सोशल मीडियावर अपलोड केला.

सोशल मीडियावर शेयर केलेला हा व्हिडीओ लोकांच्या एवढ्या पसंतीस आला कि रानू मंडळ रातोरात स्टार झाली. ज्यानंतर रानू मंडल या नावाला तिच्या आवाजानेच ओळख मिळवून दिली.