Connect with us

जाणून घ्या, १०० रुपयाच्या नव्या नोटे वरची ‘राणी की वाव’ कुठे आहे आणि तिची रंजक गोष्ट

Money

जाणून घ्या, १०० रुपयाच्या नव्या नोटे वरची ‘राणी की वाव’ कुठे आहे आणि तिची रंजक गोष्ट

भारतीय रिझर्व्ह बँक रंगेबेरंगी नवीन नोट बाजारात आणत आहे. या सत्रामध्ये आता १०० रुपयाच्या नवीन नोटेची भर पडणार आहे. हलक्या जांभळ्या रंगाची ही नवी नोट लवकरच तुमच्या हातात असेल. यावर ऐतिहासिक ‘राणी की वाव’ म्हणजेच राणीच्या विहिरीचे छायाचित्र आहे. आता ही राणी की वाव कुठे आहे हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही कारण ही राणी की वाव गुजरात मध्ये आहे. आता तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न येईल की जर आपल्या देशात अनेक सुंदर आणि ऐतिहासिक वास्तू आहेत जगातील ७ आश्चर्या पैकी एक ताजमहाल देखील आहे तरी १०० रुपयाच्या नोटेवर गुजरात मधील राणी की वाव का आहे. तर याचे उत्तर तुम्हाला राणी की वाव बद्दलची रंजक गोष्ट वाचल्यावर मिळू शकते.

गुजरातमधली पाटण इथे ‘राणी की वाव’ आहे. वाव म्हणजे विहिर होय. गुजरातमधील ज्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी तत्कालीन राजांनी खूप खोल अशा विहिरी खोदून घेतल्या. अर्थात विहिरी खूप खोल असल्यानं पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्याही बांधल्या. त्यामुळे अशा विहिरींची रचना आपल्या इथल्या विहिरींपेक्षा खूपच वेगळी आहे. इसवीसनाच्या अकराव्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते. आजचे पाटण हे गाव त्याकाळी सोळंकी साम्राज्यांची राजधानी होती. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती यांनी गावात शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली.

या पाण्याच्या विहिरी शिल्पकलेचा उत्तम नमुना ठरला. राणी की वाव ही सात मजली खोल विहीर आहे. प्रत्येक पातळीवर अत्यंत सुडौल आणि भरपूर मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत. विष्णूचे दशावतार आहेत, विष्णूच्या विविध मूर्ती आहेत, गणपती, शिव, चार हातांचा मारुती अशा असंख्य मूर्ती इथे पाहायला मिळतात. इतकंच नाही तर नृत्यांगना-अप्सरा यांच्याही देखण्या मूर्ती इथे आहेत. या विहिरीचं सौंदर्य प्रत्येकाचं डोळे दिपवून टाकणारं असंच आहे.

या विहिरींची निर्मिती राणीने केली म्हणूनच या विहिरी ‘राणी की वाव’ म्हणून ओळखल्या जातात. २०१४ साली या जागेला जागतिक वारशाचा दर्जा युनेस्कोनं दिला. २००१ पर्यंत पर्यटकांना खोल पर्यंत या विहिरीत जात येत होतं मात्र भुज भूकंपामुळे या विहिरीच्या काही भागाला धक्का बसला आहे त्यामुळे काही मजले हे बंद ठेवण्यात आले आहेत. ही विहिर ९०० वर्षे जुनी आहे.

१०० ची नवी नोट जेव्हा सगळ्यांच्या आणि विशेषतः विदेशी पर्यटकांच्या हातात येईल तेव्हा या राणी की वाव ची फ्री मध्ये प्रसिद्धी होईल आणि सगळ्यांच्या डोळ्या समोर सतत ही आल्यामुळे प्रत्यक्ष एकदा स्वताच्या डोळ्याने ही राणी की वाव पाहण्यासाठी लोक तेथे भेट देतील आणि गुजरातचा पर्यटनाचा व्यवसाय जोरदारपणे चालेल असा यामागे विचार असू शकतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top