inspiration

कानपूरच्या झोपडपट्टी ते राष्ट्रपति भवन पर्यंतचा प्रवास करणारे देशाचे नवीन राष्ट्रपति

देशाचे पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांचा कार्यकाळ 25 जुलैला संपला आणि आपल्याला नवीन राष्ट्रपति मिळाले. आपल्या नवीन राष्ट्रपतिचे नाव रामनाथ कोविंद आहे. हे तुम्हाला आता पर्यंत माहीत झाले असेलच पण रामनाथ कोविंद कोण होते त्यांनी आता पर्यंत काय कार्य केले आहेत. याबद्दल कदाचित तुम्हाला माहीती नसेल.

याकरीता आज आम्ही तुम्हाला भारताच्या 14 व्या राष्ट्रपति झालेल्या रामनाथ कोविंद यांचा जीवन प्रवास कसा होता याबद्दल माहीती देणार आहोत.

सुरुवाती जीवन

कानपुरच्या ग्रामीण भागातील डेरापूर तहसील मधील एका छोट्याश्या परौंख नावाच्या खेड्यातील एका दलित परिवारामध्ये रामनाथ यांचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण संदलपुर ब्लाकच्या ग्राम खानपुर परिषदीय प्रार्थमिक व पूर्व माध्यमिक विद्यालयात झाले. रामनाथ एका अश्या समाजात होते ज्यांच्यात शिक्षणाला कोणी फारसे महत्व देत नव्हते. पण जीवना मध्ये काही मोठे करण्याच्या उद्देशाने त्यांनी शिक्षणाला आपले माध्यम म्हणून निवडले. त्यांच्या वडिलांनी त्यांना एका छोट्याश्या किराणा दुकानात होणाऱ्या कमाईतून शिक्षण दिले. कानपुर शहराच्या बीएनएसडी इंटरमीडीएट परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर त्यांनी डीएवी कॉलेज मधून बी कॉम आणि डीएवी लॉ कॉलेज मधून विधि स्नातक चे शिक्षण पूर्ण केले.

आईएएस बनण्याचे स्वप्न घेऊन ते दिल्लीला आले

स्नातक स्तराचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर ते दिल्लीला गेले. त्यांचे एकमेव स्वप्न होते की देशाच्या प्रतिष्ठित सिविल सेवेच्या परीक्षे मध्ये यक्षाचे झेंडे गाडण्याचे. या उद्देशाने त्यांनी तयारी सुरु केली. त्याकाळी या परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करणारा कोणीही नव्हता. त्यांनी स्वताच अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले. पण मुख्य सेवे एवजी एलायड सेवेत निवड झाल्यामुळे त्यांनी नोकरी केली नाही.

मोरारजी देसाई यांचे पर्सनल सेक्रेटरी बनून राजकारणात प्रवेश केला

जून 1975 मध्ये आणीबाणी नंतर जनता पार्टीचे सरकार बनल्यानंतर ते वित्त मंत्री मोरारजी देसाईचे पर्सनल सेक्रेटरी होते. जनता पार्टीच्या सरकार मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जुनियर काउंसलर पदावर काम केले. साल 1977  ते 1979 पर्यंत रामनाथ दिल्ली हाई कोर्टात केंद्र सरकारचे वकील होते.

साल 1991 मध्ये ते भारतीय जनता पार्टी मध्ये शामिल झाले. पार्टी ने वर्ष 1990 मध्ये त्यांना घाटमपुर लोकसभा सीट मधून तिकीट दिले पण ते निवडणूक हारले. वर्ष 1993 आणि 1999 मध्ये पार्टी ने त्यांना प्रदेशातून दोन वेळा राज्यसभेत पाठवले. पार्टी मध्ये एक मोठा दलित चेहऱ्याच्या रुपामध्ये आपली ओळख बनविल्यानंतर त्यांना अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ता म्हणून पदभार मिळाला. वर्ष 2007 मध्ये पार्टी ने त्यांना प्रदेशच्या राजकारणात सक्रीय करण्यासाठी भोगनीपुर सीट मधून निवडणूक लढण्यास सांगितले पण ते निवडणूक हारले.

अतिक्षय साध्या स्वभावाचे व्यक्ती आहेत

साल 2015 मध्ये त्यांनी बिहारचा राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला. रामनाथ कोविंद यांना एक अत्यंत साध्या स्वभावाचा नेता म्हणून ओळखले जाते. सांसद, मंत्री आणि राज्यपाल बनल्यानंतर देखील ते नेहमी सामान्य लोकांशी जोडलेले राहीले. त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांनी आपले पारिवारिक घर देखील शाळेसाठी दान दिले.


Show More

Related Articles

Back to top button