Connect with us

भगवान श्रीराम यांना वनवास 14 वर्षच का? कमी किंवा जास्त का नाही, जाणून घ्या आता पर्यंतचे सर्वात मोठे रहस्य

Dharmik

भगवान श्रीराम यांना वनवास 14 वर्षच का? कमी किंवा जास्त का नाही, जाणून घ्या आता पर्यंतचे सर्वात मोठे रहस्य

हिंदू धर्मा मध्ये श्रीराम हे श्रेष्ठ पुरुष मानले जातात कारण भगवान विष्णू यांनी श्रीरामाच्या रुपात जन्म घेऊन मानवजातीचा उध्दार केला होता. सर्वांना माहित आहे की त्रेता युगा मध्ये भगवान श्रीराम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता जो अत्यंत अत्यंत दुखदायी होता आणि असे कोणतेही वडील आपल्या मुला सोबत करू शकत नाहीत. महाराज दशरथ यांनी आपल्या सर्वात प्रिय पुत्रास 14 वर्षे वनवास दिला. कारण राजा दशरथ यांनी आपली रानी कैकयीला वचन दिलेले होते आणि ते त्यांना पूर्ण करायचे होते. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की कैकयी ने भगवान रामासाठी 14 वर्षांचा वनवास का मागितला? तो 12 किंवा 15 वर्षांचा का नाही मागितला. यामागे एक कारण होते जे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे समजल्यावर तुम्हाला विश्वास होईल की प्रत्येक गोष्टी मागे काही तरी कारण असते.

भगवान श्रीराम यांना वनावास १४ वर्षच का?

कैकयी ने जेव्हा राजा दशरथ यांच्या कडे श्रीरामासाठी 14 वर्षांचा वनवास मागितला यामागे प्रशासनिक कारण सांगितले जाते. रामायण हे त्रेतायुग काळातील आहे जेव्हा नियम होता की जर कोणताही राजाने 14 वर्षे आपले सिंहासन सोडले तर त्यास राजा बनण्याचा अधिकार नाही राहत.

त्यामुळे कैकेयीने राजा दशरथकडे श्रीरामांसाठी 14 वर्षे वनवास हा विचारपूर्वक मागितला होता ज्यामुळे जेव्हा श्रीराम वनवासातून परत येतील तेव्हा त्यांना राजा बनण्याचा अधिकार राहणार नाही आणि तिचा मुलगा भरत सिंहासनावर बसेल. परंतु भरताने तसे होऊ दिले नाही आणि त्याने त्या सिंहासनास तसेच ठेवले आणि स्वता वनवासा प्रमाणे जीवन जगणे सुरु केले. त्यानंतर जेव्हा श्रीराम वनवासातून पुन्हा परत आले तेव्हा भरताने श्रीरामांना सन्मानपूर्वक सिंहासन परत दिले. त्यांतर भगवान राम यांनी सिंहासन सांभाळले आणि राज्यकारभार केला.

असेच द्वापरयुग मध्ये झाले जेव्हा राजा 13 वर्ष राज सिंहासन सोडत असल्यास त्याला पुन्हा राजा बनण्याचा अधिकार मिळत नसे. याच नियमामुळे दुर्योधनाने पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास मिळण्याची मागणी केली होती.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top