Raksha Bandhan: भावाला राखी बांधतांना ‘हा’ मंत्र जप करा

Raksha Bandhan 2019: रक्षाबंधन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सगळ्या बहिणी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावर राखी (Rakhi) बांधतील. रात्रीच बहिणी आपल्या हातावर मेहंदी लावून आपली हौसमौज पूर्ण करण्याच्या तयारीला लागलेल्या असतील. सकाळी राखी बांधल्या नंतर भाऊ आपल्याला काय गिफ्ट देईल याची उत्सुकता देखील असेल. पण रक्षाबंधन हे फक्त गिफ्ट मिळवण्यासाठी केलं जात असं नाही तर त्याबदल्यात भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करेल असे वचन देतो. हिंदू धर्मातील या खास सणाला अजून जास्त खास बनवण्यासाठी राखी बांधताना मंत्र बोलला गेला तर आनंद द्विगुणित होईल. राखी बांधताना हा मंत्र बोलल्याने आपल्या दोघातील प्रेम टिकून राहील.

 

राखी बांधताना खालील मंत्र जप करावा

‘येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्रो महाबलः
तेनत्वाम प्रति बद्धनामि रक्षे, माचल-माचलः’

या मंत्राचा मराठी मधील अर्थ पुढील प्रमाणे आहे.

अर्थ: या मंत्राचा अर्थ ज्या प्रमाणे राजा बलि ने रक्षा सूत्राने विचिलित न होता आपले सगळे काही दान केले होते, त्याच प्रमाणे रक्षा आज मी बांधते आहे. तुम्ही देखील आपल्या उद्देश्यापासून विचिलित न होता दृढ बनून राहा आणि माझ्या भावाचे रक्षण कर.

रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधन चा सण गुरुवारच्या दिवशी आला आहे त्यामुळे याचे महत्व अजून जास्त वाढलेले आहे. या वेळी कोणतेही ग्रहण किंवा कोणतेही अशुभ योग नाही आहे आणि त्यामुळेच यावेळेचं रक्षाबंधन शुभ आणि सौभाग्यशाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here