astrology

भावाला राखी बांधताना पूजेच्या थाळीत या 7 वस्तू असणे आवश्यक आहेत

प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी रक्षाबंधनचा दिवस महत्वाचा आणि खास असतो. यादिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. राखी बांधण्या अगोदर एक विशेष पुजेची/आरतीची थाळी तयार केली जाते. या आरतीच्या थाळीमध्ये कोणकोणत्या वस्तू असणे आवश्यक आहे ते आज आपण येथे पाहू.

कुंकू

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मस्तकी कुमकुम तिलक लावून होते. हि परंपरा अत्यंत जुनी आहे आणि आजही याचे पालन केले जाते. कुमकुम तिलक मान-सन्मानाचे प्रतिक आहे. बहिण आपल्या भावा बद्दलचा सन्मान यातून प्रकट करते. सोबतच बहिण आपल्या भावाच्या मस्तकी टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यासाठी थाळी मध्ये कुंकू असावे.

तांदूळ

टिळा लावल्यानंतर त्यावर तांदूळ लावले जातात. या तांदुळाला अक्षता देखील बोलले जाते. याचा अर्थ अक्षत म्हणजे जो अर्धवट नाही. अक्षता लावण्या मागील भावना हि आहे की भावाच्या जीवनात टिळयाचा शुभ प्रभाव नेहमी टिकून रहावा. तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने जीवनात भौतिक सुख-सुविधा प्राप्त होतात.

नारळ

बहिण आपल्या भावाला टिळा लावल्या नंतर हाता मध्ये नारळ देते. नारळाला श्रीफळ देखील बोलले जाते. श्री म्हणजे देवी लक्ष्मीचे फळ. हे सुख-समृद्धीचे प्रतिक आहे. बहिण भावाला नारळ देऊन प्रार्थना करते कि भावाच्या जीवनात सुख आणि समृद्धी नेहमी असावी आणि नेहमी त्याची प्रगती होत रहावी.

राखी (रक्षा सूत्र)

राखी बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ. आपल्या शरीरामध्ये कोणताही आजार या दोषांशी संबंधित असतात. रक्षा सूत्र आपल्या मनगटावर बांधल्याने शरीरातील हे संतुलित राहते. हा धागा मनगटावर बांधल्याने नसांवर दबाव राहतो, ज्यामुळे हे तिन्ही दोघ नियंत्रणात राहतात. रक्षा सुत्राचा अर्थ ते सूत्र (धागा) जे आपल्या शरीराचे रक्षण करते. खरतर राखी बांधण्याचे अजून एक मनोवैज्ञानिक मत देखील आहे. बहिण राखी बांधून भावा कडून आयुष्यभर आपल्या रक्षणाचे वचन घेते. भावाला राखी नेहमी या गोष्टीची आठवण करून देतो कि त्याला नेहमी बहिणीचे रक्षण करायचे आहे.

मिठाई

राखी बांधल्यानंतर बहिण भावाला मिठाई देऊन त्याचे तोंड गोड करते. मिठाई या गोष्टीचे प्रतिक आहे कि भाऊ बहिणीच्या नात्यात कधीही कटुता येऊ नये. मिठाई प्रमाणे नेहमी गोडवा असावा.

दिवा (दीपक)

राखी बांधल्यानंतर बहिण नेहमी दीपक लावून आरती ओवाळते. असे मानले जाते की आरती ओवाळल्याने सर्व प्रकारची वाईट नजरे पासून भावाची रक्षा होते. आरती ओवाळून बहिण प्रार्थना करते कि भाऊ नेहमी निरोगी आणि सुखी रहावा.

पाण्याने भरलेला कलश (तांब्या)

राखीच्या थाळीमध्ये पाण्याने भरलेला कलश देखील ठेवला जातो. हे पाणी कुंकू मध्ये मिक्स करून त्याचा टिळा लावला जातो. प्रत्येक शुभ कामाच्या सुरुवातीला पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो. असे मानले जाते कि कलशामध्ये सर्व पवित्र तीर्थ आणि देवी-देवतांचा वास असतो. या कलशाच्या प्रभावाने भाऊ आणि बहिणीच्या आयुष्यात नेहमी सुख आणि प्रेम नेहमी राहते.


Show More

Related Articles

Back to top button