inspiration

जीवनात पुढे जाण्याची संधी सगळ्यांना मिळते, मंग काही लोक तिचा फायदा का नाही घेऊ शकत

एका देशामध्ये एक राजा होता. तो एक दिवस जंगला मध्ये शिकार करण्यासाठी गेला. रस्ता भटकल्यामुळे त्याचे सैनिक मागे राहिले. राजास तहान लागली होती. तेवढयात राजाला एक लाकुडतोड्या नजरेस पडला. राजाने त्याच्या कडून पाणी घेऊन ते प्यायले आणि लाकुडतोड्यास सांगितले कि तू माझ्या राजमहल मध्ये ये, मी तुला योग्य पुरस्कार देईल.

यानंतर काही दिवस निघून गेले. एक दिवस लाकुडतोड्या राजास भेटण्यासाठी राजमहाली आला. राजा लाकुडतोड्याला पाहून आनंदी झाला आणि त्याने लाकुडतोड्याला चंदनाची झाडे असलेली एक बाग बक्षीस म्हणून दिली. लाकुडतोड्या देखील चंदनाची बाग मिळाल्यामुळे आनंदी झाला. त्याने विचार केला आता आपले जीवन आरामात जाईल. परंतु लाकुडतोड्याला चंदनाचे महत्व माहित नव्हते.

लाकुडतोड्या दररोज चंदनाचे झाड कापून त्याचा कोळसा बनवू लागला आणि त्यास बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करू लागला. काही दिवसातच चंदनाचा सुंदर बगीचा ओसाड जागेत बदलला, ज्यामध्ये कोळसे ढीग लावून ठेवले होते. आता तेथे फक्त मोजकेच झाड शिल्लक राहिले होते, जे लाकुडतोड्याला सावली देण्याचे काम करत होते.

एक दिवस राजा त्या बगीचा मध्ये आले तेथे त्यांनी पाहिले आणि त्यांना आश्चर्य झाले. तेवढयात राजाची नजर लाकुडतोड्यावर गेली. राजाने त्यास बोलावले आणि विचारले मी तुला चंदनाचा हिरवागार बगीचा दिला होता, तू त्याची काय अवस्था केली आहेस. लाकुडतोड्याने राजास सगळी हकीकत सांगितली.

लाकुडतोड्याचे बोलणे झाल्यावर राजाने लाकुडतोड्याला चंदनाच्या लाकडाचा एक लहानसा तुकडा दिला आणि सांगितले यास बाजारात जाऊन विकून ये. लाकुडतोड्याला त्या लहानश्या तुकड्याचे चांगले पैसे मिळाले. त्याने ही गोष्ट राजाला सांगितली त्यावर राजा म्हणाले या लाकडाचे मूल्य कोळशाच्या पेक्षा जास्त आहे.

राजाचे बोलणे ऐकून लाकुडतोड्याला आपली चुक समजली, पण तो पर्यंत उशीर झालेला होता. लाकुडतोड्या आपल्या नशिबावर रडत होता. त्याला माहीतच नव्हते कि ज्या लाकडाला तो कोळसा बनवून विकत होता, ते लाकूड बहुमुल्य होते. या नंतर लाकुडतोड्या आपल्या गावी परत गेला.

गोष्टी मधून काय शिकाल

सगळ्यांना जीवना मध्ये कधी ना कधी एक संधी नक्की मिळते. जेव्हा त्या व्यक्तीला पुढे जाण्याची संधी मिळते. काही लोक या संधीचा फायदा घेतात, तर काही लोक त्या संधीला ओळखू शकत नाहीत. त्यामुळेच ते लोक पुढे जाऊ शकत नाहीत. यासाठी नशिबाच्या भरोश्यावर राहू नये. योग्य संधीच्या नेहमी शोधात राहावे, संधीला योग्य वेळी ओळखावे आणि संधीचा फायदा घेऊन आयुष्यात पुढे जावे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button