celebritiesentertenment

नवरा असावा तर शिल्पा शेट्टी चा नवरा राज कुंद्रा सारखा, गिफ्ट केल्या आहेत अश्या वस्तू ज्या पाहून होश उडतील

बॉलीवूडची स्टाईलिश अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज देशातील प्रसिध्द बिजनेस वुमेन झाली आहे. बॉलीवूड मध्ये काम करणे बंद केल्या नंतर साल 2009 मध्ये शिल्पाने राज कुंद्रा सोबत विवाह केला होता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मध्ये जबरदस्त केमेस्ट्री पाहण्यास मिळते. शिल्पा आणि राज यांची पहिली भेट लंडन मध्ये झाली होती आणि यानंतर दोघांमधल्या दोस्तीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पण तुम्हाला माहित आहे का, राज कुंद्राने आपल्या पत्नीला लग्ना नंतर काय काय गिफ्ट दिली आहेत. एक्ट्रेस शिल्पा शेट्टीचे पती राज किंद्रा हे एक बिजनेस मन आहेत आणि ते आपल्या पत्नीला नेहमी महागडे गिफ्ट देत असतात, पण ही महागडी गिफ्ट अशी आहेत ज्याचा विचार एखादा श्रीमंत व्यक्ती देखील करू शकत नाही.

एक्ट्रेस शिल्पा शेट्टी चे पती राज कुंद्रा बिजनेस मैन आहेत

रियालिटी शो ‘बिग ब्रदर’ (2007) जिंकल्या नंतर प्रसिद्धीत आली होती शिल्पा त्यावेळी राज ची भेट लंडन मध्ये झालेली. राज बिजनेसच्या दुनियेत अत्यंत फेमस आहेत. असे बोलले जाते कि शिल्पा आपल्या परफ्युम ब्रांड एस-2 च्या प्रमोशनसाठी लंडन मध्ये होती त्यावेळी राज सोबत तिची भेट झाली होती. राज ने शिल्पाच्या परफ्युम ब्रांडला प्रमोट करण्यासाठी भरपूर मदत केली होती. 2009 मध्ये लग्न झाल्या पासून यांच्या मध्ये चांगली केमेस्ट्री पाहण्यास मिळत आहे. शिल्पा आणि राज नेहमी आपले फोटोज सोशल मिडिया वर शेयर करत असतात ज्यामध्ये दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग असल्याचे दिसून येते.

शिल्पावर भरपूर प्रेम आहे राज कुंद्रा यांचे

राज कुंद्रा ने ज्या पद्धतीने शिल्पा सोबत जीवन जगले आहेत ते पाहून कोणीही म्हणेल कि त्याच्या सारखा पती सर्वांना मिळावा. राज शिल्पावर भरपूर प्रेम करतात आणि तिची भरपूर काळजी घेतात. लग्नाच्या नंतर राज ने शिल्पाला ते सर्व दिले आहे जे कोणाचेही स्वप्न असू शकते. राज ने शिल्पाच्या लग्जीरियस लाइफसाठी अत्यंत महागडे गिफ्ट्स दिलेले आहेत.

शिल्पाला हे गिफ्ट दिलेले आहेत राज कुंद्रा यांनी

राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टीला जगातील सर्वात उंच बिल्डींग बुर्ज खलीफाच्या 19 व्या फ्लोर वर एक अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. या अगोदर राज ने लग्नाच्या दिवशी 50 लाख रुपयाचा वेडिंग लहंगा आणि 3 करोड रुपये किमतीची 20 कैरेटचा एक हिऱ्याची अंगठी गिफ्ट केली आहे. यानंतर राज कुंद्राने शिल्पाला मुंबई मध्ये किनारा नावाचा एक बंगला गिफ्ट केला आहे, जो शिल्पा खरेदी करण्याचे स्वप्न पाहत होती. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनी इंग्लंड मध्ये 7 रूमचा एक आलिशान बंगला आणि अनेक महागड्या गाड्या गिफ्ट केल्या आहेत.

तुमच्या माहितीसाठी शिल्पा शेट्टीने आंतरराष्ट्रीय शो बिग ब्रदर जिंकून जगभरात प्रसिद्धी मिळवली होती. शिल्पा चांगल्या अभिनय करण्यासोबत चांगला डान्स सुध्दा करते. शिल्पा आपल्या वैवाहिक जीवना मध्ये अत्यंत आनंदी आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे.


Show More

Related Articles

Back to top button