Connect with us

आपल्या डाइट मध्ये शमाविष्ट करा मनुके, तर होतील हे 10 अप्रतिम फायदे

Food

आपल्या डाइट मध्ये शमाविष्ट करा मनुके, तर होतील हे 10 अप्रतिम फायदे

आयुर्वेदात किसमिसचे (मनुका) अनेक फायदे सांगितले आहेत. अनेक लोक बोलीभाषेत यांना मनुके देखील म्हणतात. द्राक्ष विशिष्ट पद्धतीने सुकवल्याने किसमिस तयार होतात. मनुके सर्दी, खोकला यावर चांगले औषध मानले जाते. हा सुक्का मेवा शरीरातील वायू दोष दूर करतो आणि रक्त वाढ करतो. मनुक्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. चला पाहूया किसमिसचे काय फायदे आहेत. आणि कसे हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

ब्लड सर्कुलेशन

मनुके सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे शरीराचे तेज वाढते आणि रंग उजळतो.

पाचनशक्ती

बद्धकोष्ठता आणि पचनाची समस्या असल्यास किसमिस उपयोगी ठरतात. किसमिस खाल्ल्या नंतर ते पोटातील पाणी शोषून घेते. आणि स्वतः फुगून तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास आराम देते. मानुक्यात एंंटी अॉक्सीडेंट, फाइबर, कैल्शियम असते ज्यामुळे बद्धकोष्ठता असल्यास हे फायदेशीर ठरते. ज्यांना बद्धकोष्ठतेच त्रास आहे त्यांनी दररोज चार ते पाच मनुके सेवन करावे ज्यामुळे त्यांना फायदा होईल.

वजन वाढवण्यासाठी मदत करतो

जसे कि तुम्हाला माहित असेलच की मेवे वजन वाढवण्यास मदत करतात. मनुक्यामध्ये ग्लुकोज असते जे एनर्जी देते. मनुके खाऊन तुम्ही आपले कोलेस्टेरॉल न वाढवता आपले वजन वाढवू शकता.

कैंसर पासून बचाव

चिकित्सक सांगतात कि आपल्या डाइट मध्ये किसमिस शामिल केल्याने अनेक प्रकारच्या कैंसर पासून वाचता येऊ शकते.

झोप न येण्याची समस्या

हल्लीच्या काळात अनेक लोकांना झोप न येण्याची समस्या आहे. जर मनुके सेवन केले तर इंसोमेनिया सारख्या आजारापासून वाचता येते.

रक्त वाढ करण्यास मदत

किसमिस मध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते त्यामुळे याच्या सेवनामुळे एनिमिया किंवा सोप्प्या भाषेत रक्ताची कमी दूर करण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला रक्ताची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही मनुके सेवन करावेत.

एंटी बैक्टिरियल गुण

किसमिस मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. ज्यामधील एक आहे एंटी बैक्टिरियल गुण. हे तुम्हाला सर्दी खोकला सारख्या आजारापासून वाचवते. जर तुम्हाला कधी सर्दी खोकला झाला तर तुम्ही किसमिस घरगुती उपाय म्हणून वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

सांधेदुखी मध्ये आराम

किसमिस मध्ये कैल्शियम असते. कैल्शियम हाडांच्या आरोग्याच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर रोज सकाळी भिजलेले मनुके सेवन केल्याने फायदा होतो.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

किसमिस मध्ये बीटा कैरोटीन आणि विटामिन ए असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मनुके खाण्यामुळे डोळ्यांच्या मासपेशी निरोगी राहतात.

हृदयरोग

मनुके सेवन केल्यामुळे हृद्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सोबतच मनुक्यामध्ये पोटैशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत मिळते.

किसमिसची प्रवृत्ती गरम आहे त्यामुळे चिकित्सक यांना नेहमी थंडी मध्ये सेवन करण्याचा सल्ला देतात. याचे सेवन तुम्ही उन्हाळ्यात देखील करू शकता पण कमी प्रमाणात कारण याच्या जास्त सेवनामुळे जुलाब आणि ताप येणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top