Breaking News

या लोकांसाठी मुळीच अशुभ नसतात राहु-केतु, एका झटक्यात बनवतात मालामाल

राहू आणि केतु हल्लीच एका राशीतून दुसर्‍या राशीत गेले आहेत. राहू वृषभ राशीत गेले आहेत तर केतु वृश्चिक राशीमध्ये गेले आहेत. मेदिनी ज्योतिषानुसार, राहू आणि केतूच्या गोचर चा परिणाम केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये होणार आहे.

हा काळ जगासाठी चांगला नाही, जर अनेक देशांमध्ये यु द्धा सारखी परिस्थिती उद्भवू शकते, तर महामारी चे स्वरूप अजून जास्त विक्राळ स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतु हे क्रूर ग्रह मानले गेले आहेत. कोणत्याही राशीवर या दोन राशीच्या ग्रहांचा त्या राशीच्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. सध्या संपूर्ण जग राहू आणि केतू यांच्या दुष्परिणामांना सामोरे जात आहे.

परंतु त्याच वेळी असे काही राशी अश्या देखील आहेत ज्या राशीच्या लोकांना याचे विशेष फायदे मिळवणार आहेत. राहू आणि केतू सर्वात क्रूर ग्रह मानले गेले असले तरी कुंडलीत काही ठिकाणी त्यांची उपस्थिती अत्यंत शुभ परिणाम देते. जाणून घ्या जन्मकुंडली मधील ते कोणते स्थान आहेत…

कुंडलीचे तिसरे स्थान

जन्मकुंडलीच्या तिसर्‍या घरात राहू आणि केतुची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जाते. ज्यालोकांच्या जन्मकुंडली मधील तिसरे स्थान मजबूत असते ते लोक बलवान आणि सामर्थ्यवान असतात.

जर राहू आणि केतु तुमच्या राशीच्या तिसर्‍या घरात असतील तर तुम्ही घाबरण्या ऐवजी आनंदी असले पाहिजे कारण तिसर्‍या घरात राहू आणि केतू आपल्या आयुष्यात शक्ती व सामर्थ्य निर्माण करतात. अशा मूळ लोकांची कारकीर्द कु स्ती किंवा बॉडी बिल्डिंग मध्ये चमकते. तसेच, हे लोक स्वावलंबी, महत्वाकांक्षी आणि दृढनिश्चयी असतात.

कुंडलीचे सहावे स्थान

कुंडलीचे सहावे स्थान म्हणजे शत्रूचे स्थान असते. अशा स्थितीत राहू आणि केतू या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे शत्रू आपले नुकसान करू शकत नाहीत. हे लोक खूप उत्साही असतात आणि ते त्यांची शक्ती चांगल्या ठिकाणी वापरतात आणि यश मिळवतात.

आयुष्यात मोठे निर्णय घेण्यास त्यांना कधीही भीती वाटत नाही. ज्यांचे राहू व केतू कुंडलीच्या सहाव्या स्थानी आहेत त्यांना न्यायालयीन खटल्यांमध्ये लवकर यश मिळते. या लोकांनी पैशांचे व्यवहार फार काळजीपूर्वक हाताळायला हवेत.

कुंडलीचे दहावे स्थान

ज्या कुंडली मध्ये राहू व केतू दहाव्या घरात राहतात ते नोकरीच्या बाबतीत खूप प्रगती करतात. असे लोक राजकारण आणि सरकारी क्षेत्रात पुढे जातात. ते चांगले नेते म्हणून उदयास येतात, परंतु पैसे खर्च करण्याच्या बाबतीत ते थोडे कंजूस असतात. पण त्यांचा हा कंजूस स्वभाव त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते पैसे वाचविण्यात यशस्वी होतात.

कुंडली मधील अकरावे स्थान

जर राहु आणि केतू एखाद्याच्या कुंडली मध्ये 11 व्या भावात म्हणजेच घरात असतील तर ते खूप शुभ मानले जाते. कुंडलीचे अकरावे घर म्हणजे खर्च दर्शवते, म्हणून जर राहु आणि केतू या घरात राहत असतील तर आपण त्या क्षेत्रात खर्च करता जेथे आपली संपत्ती दुप्पट होते.

राहू आणि केतूच्या प्रभावामुळे आपल्याला गुंतवणूकीचा फायदा होतो. राहु आणि केतु जर तुमच्या कुंडलीच्या अकराव्या स्थानावर असतील तर तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

राहूची ही विशेष स्थिती

मेष, वृषभ आणि कर्क राशीत केतू असणारे लोक देखील शुभ परिणाम प्राप्त करतात. केतूची उपस्थिती या लोकांना प्रत्येक कामात यशस्वी करते. तसेच विवाहित जीवन खूप आनंदी राहते.

जन्मकुंडलीचे बारावे स्थान

केतु आपल्या राशीच्या 12 व्या घरात असल्यास आपल्या मेहनतीचे परिपूर्ण फळ तुम्हाला मिळतील. असे मानले जाते कि या लोकांना मृत्यूनंतर चांगल्या कर्मांनी मोक्ष प्राप्त होते.

या लोकांना कधीही पैशाच्या आणि मालमत्तेच्या बाबतीत अडचण येत नाहीत. परंतु आपल्याला बर्‍याच वेळा अशा लोकांना सामोरे जावे लागते जे स्वत: ला तुमच्या जवळ दर्शवतात पण समाजात तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात.

About Marathi Gold Team