आमिर खान आणि राम गोपाल वर्मा यांच्या मधील वादाचे काय कारण होते? का आमिर सोबत काम न करण्याची शप्पथ घेतली?

राम गोपाल वर्मा हा नेहमीच आपल्या हटके फिल्म आणि विवादित इंटरव्ह्यू मुळे चर्चेत असतो. अर्थातच राम गोपाल वर्मा यांनी अनेक मनोरंजक फिल्म बॉलीवूडला दिले आहेत. यामध्ये रंगीला, सरकार इत्यादी बरेच फिल्म आहेत. परंतु रामगोपाल वर्मा यांचे नाव घेतले कि त्यांचा ‘रंगीला’ चित्रपट डोळ्या समोर येतो कारण यामध्ये अमीर खान, जैकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर यांची चांगली केमेस्ट्री पाहण्यास मिळाली होती. हि फिल्म त्यावेळी सुपरहिट झाली होती आणि आजही लोक आवडीने हा चित्रपट पाहतात.

तर आज आपण जाणून घेणार आहोत कि रामगोपाल वर्मा आणि आमिर खान यांच्यात एवढा मोठा सुपरहिट चित्रपट केल्या नंतर देखील पुन्हा एकमेकांसोबत काम न करण्याची शप्पथ घेण्याची वेळ का आली. यास थोडक्यात सांगायचे झाले तर गैरसमज हेच कारण सांगता येईल. पण हा गैरसमज काय आहे आणि तो कसा निर्माण झाला आणि पुढे वाढत जाऊन टोकाला पोहचला हे जाणून घेणे देखील अतिशय महत्वाचे आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊ.

रंगीला चित्रपट करण्याचे जेव्हा रामगोपाल वर्मा यांनी ठरवले तेव्हा ते आमिर खानकडे फिल्मची स्टोरी सांगण्यास गेले. ती आमिर खान यास आवडली आणि काही काळाने चित्रपटाची शूटिंग देखील सुरु झाली. पण थोडा चित्रपट चित्रित झाल्यावर आमिर खानच्या नजरेस चित्रपटातील काही त्रुटी समोर आल्या यामागे कारण होते आमिर खानने या अगोदर असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलेलं काम. त्याच्या या अनुभवामुळे आमिरच्या लक्षात आले कि या चित्रपटाचा हिरो म्हणजेच मुन्ना (आमिर खान) अतिशय रोखठोक आणि बेधडक आहे. तो फिल्म तिकीटचा काळा बाजार करतो. टपोरी सारखा राहतो, कोणालाही घाबरत नाही. असे सगळं असताना तो मिली (उर्मिला मातोंडकर) ला फक्त एक वाक्य बोलू शकत नाही आणि त्यावरच आधारित संपूर्ण चित्रपट आहे.

तसेच या फिल्म मध्ये मुन्ना, मिली आणि जैकी श्रॉफ तिघेही चांगल्या स्वभावाचे आहेत त्यामुळे विनाकारण फक्त एका वाक्यास मुन्ना बोलत नसल्याने फिल्म विनाकारण लांबत आहे. हे आपले मत आमिर ने रामगोपाल वर्माला सांगितलं आणि त्याच सोबत सांगितलं कि तू या फिल्मचा डायरेक्टर आहेस आणि कोणत्याही दोन व्यक्तींची मत सारखीच असावीत हे गरजेचं नाही त्यामुळे तुला जे योग्य वाटेल ते आपण करू. यानंतर आमिर ने रामगोपाल वर्माने जसे सांगितलं तसेच काम केले. पण ज्यावेळी आमिरला काही इनपुट रामूला द्यावेसे वाटले तेव्हा त्याने ते आमिरला दिले पण ते रामूने कधीच फॉलो केले नाहीत. शेवटी फिल्म तयार झाली आणि रिलीज होऊन सुपरहिट देखील झाली.

रंगीला सुपरहिट झाल्या नंतर सगळे आमिर खानच्या एक्टिंगची चर्चा करू लागले सगळ्यांना त्याची एक्टिंग आवडली होती. यानंतर फिल्म सुपरहिट झाल्यामुळे एक सक्सेस पार्टी आयोजित केली गेली जेथे ‘रंगीला’ फिल्मची स्टारकास्ट उपस्थित होती. आमिर अनुसार तेव्हा रामू त्याच्या जवळ आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि तो अत्यंत भावुक झाला होता आणि म्हणाला कि या चित्रपटा मध्ये तू उत्तम काम केले आहेस, मी तुझ्याकडून फिल्म मेकिंग बद्दल बरच काही शिकलो देखील आहे. मला माहीत नाही भविष्यात मी तुझ्या सोबत पुन्हा काम करू शकेल किंवा नाही पण या फिल्मसाठी तुला फिल्मफेअरचा बेस्ट एक्तरचा अवार्ड नक्की मिळेल. एवढ्या पर्यंत सगळं काही ठीक होत पण पुढे गडबड होण्यास सुरुवात झाली.

फिल्म रिलीज नंतर पाच-सहा महिन्याने रामू ने फिल्मफेअरला एक इंटरव्ह्यू दिला. पत्रकाराने रामूला विचारले ‘या फिल्म मध्ये आमिरला करण्यासारखे भरपूर काही होते पण बाकीच्या लोकांना जास्त काही वाव नव्हता?’ या प्रश्नाला उत्तर देताना रामगोपाल वर्मा म्हणाले ‘असं काही नाही कि फक्त आमिर खानचे पात्र दमदार होते जेव्हा मुन्ना मिलीला घेऊन फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जातो तेव्हा तेथील वेटर सोबतच्या सीन मध्ये बोलत तर आमिर होता पण वेटरच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून लोक हसले होते. आणि या सीन मध्ये वेटर ने आमिर पेक्षा चांगला अभिनय केला होता. हा इंटरह्यू नंतर दोन-तीन दिवसांनी पब्लिश झाला.

जेव्हा इंटरव्ह्यू प्रसिद्ध झाला तेव्हा टायटल मध्ये लिहिले होते ‘रंगीला’ मध्ये वेटरची एक्टिंग आमिर पेक्षा चांगली. या गैरसमज निर्माण करणाऱ्या टायटलमुळे आमिर खान भडकला आणि रामगोपाल वर्माला याबद्दल विचारणा करण्यासाठी जेव्हा आमिर ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो संपर्क होऊ शकला नाही कारण रामगोपाल वर्मा शूटिंग निमित्त बाहेर होता आणि या काळी मोबाईल नसल्याने संपर्क झाला नाही. त्यामुळे आमिरला वाटले कि रामू त्याला टाळत आहे. यामुळे आमिर भयंकर चिडला आणि त्याने देखील एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यात सांगितले कि रामू मुन्नाला मिळालेल्या प्रसिद्धी आणि प्रशंसेमुळे जळत आहे आणि त्यास खाली दाखवण्यासाठी तो असे बोलत आहे.

यासगळ्या नंतर जेव्हा रामू पुन्हा परत आला तेव्हा पुन्हा त्याने इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलं कि मी असे काही बोललो नव्हतो पत्रकाराने चुकीचा अर्थ काढून सगळं छापलं आहे. त्यानंतर पत्रकाराने सांगितलं कि आमिर सांगत आहे कि तू त्याच्यावर जळत आहेस यावर उत्तर देताना रामू हात जोडत म्हणाला यापुढे मी आमिर सोबत काम करणार नाही कारण माझ्या कडे आमिर प्रमाणे कमिटमेंट नाही आहे आणि पेशन्स देखील नाही आहेत. या नंतर काही वर्षाने जेव्हा आमिरला प्रश्न केला गेला कि रामू म्हणत आहे कि आमिर सोबत काम करणार नाही त्यावर आमिर म्हणाला कि जर रामू माझ्या सोबत काम करणार नसेल तर यापेक्षा मोठ्या आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काही नसू शकते. अश्या प्रकारे रामू आणि आमिर यांच्या मध्ये दुरावा आला.