प्रत्येक ग्रह आपल्या वेळेच्या अनुसार आपली राशी बदलत असतो, याचा व्यक्तीच्या आयुष्यावर म्हणजेच सर्व 12 राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतु हे पाप ग्रह मानले गेले आहेत. या दोघांना छाया ग्रह म्हणतात. यांचे प्रत्यक्ष काही अस्तित्व नसते.
राहु-केतु 21 सप्टेंबर 2020 रोजी उलटी चाल चालणार आहेत. मिथुन राशी मधून राहु वृषभ राशीत आणि केतु धनु राशी मधून वृश्चिक राशी मध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशीवर कमी अधिक प्रमाणात होणार आहे.
कोणत्या राशीसाठी राहु-केतु ची वक्री चाल शुभ असणार आहे जाणून घेऊ
वृषभ राशीच्या लोकांच्या भाग्यामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. आपल्याला अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग तयार होत आहेत. समाजा मधील आपला मानसन्मान राहु-केतुच्या परिवर्तनामुळे वाढू शकतो. आपल्याला जीवनामध्ये धन कमावण्यासाठी नवीन संधी प्राप्त होतील. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. आपल्याला वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला कुटुंबामध्ये सुख-शांतीचा अनुभव मिळेल.
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. आपल्याला धन लाभ होण्याचे योग आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. ज्याकारणाने तुमचे मन आनंदित राहील. कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळू शकते. आपले शत्रू आपल्या पासून दूर होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश प्राप्ती होईल.
कन्या राशीसाठी हे राशी परिवर्तन शुभ असणार आहे. आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. राजकारणाशी निगडित लोकांना यश प्राप्ती होऊ शकते. अनपेक्षितपणे धन लाभ होण्याचा योग आहे. आपल्या कामामध्ये मित्रांची चांगली मदत होईल. प्रत्येक क्षेत्रात नशीब आपल्याला मदत करेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
तुला राशीसाठी हा काळ आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने चांगला राहणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्या सोबतच पगारवाढ मिळाल्यामुळे डबल आनंद होईल. एखाद्या जुन्या आजारामधून मुक्तता होऊ शकते. राहु-केतु चे राशी परिवर्तन आपल्याला अनेक भौतिक सुखाची प्राप्ती करून देईल.
वृश्चिक राशीच्या लोकांना व्यापारामध्ये मोठा धन लाभ होण्याचे योग आहेत. समाजातील आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. मोठ्या प्रभावशाली व्यक्ती सोबत भेट होऊ शकते ज्याचा तुम्हाला लाभ होईल. घरगुती सुखात वाढ होईल. आपण आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या बाबतीत यश संपादन कराल.
मकर राशी च्या लोकांना धन प्राप्तीचे नवीन मार्ग प्राप्त होईल. या राशीची आर्थिक स्थिती वेगाने सुधारणार आहे. या राशीच्या व्यक्तींना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. आपल्या कार्यात नशिबाच्या साह्याने आपण यश मिळवू शकता. जीवनात सुखसमृध्दीची प्राप्ती होईल.
मीन राशीच्या लोकांना या राहु-केतु च्या राशी परिवर्तनामुळे मनोवांच्छित लाभ मिळणार आहेत. आपले कौटुंबिक वातावरण सुखसमृध्दीने भरलेलं राहील. समाजातील आपली प्रतिष्ठा वाढ होईल. आपल्या आर्थिक स्थितीमध्ये उत्तम सुधारणा होईल. आपले लव्हलाइफ रोमँटिक राहील.
इतर राशीसाठी राहु-केतु यांचे राशी परिवर्तन सामान्य किंवा अति सामान्य राहण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही. ग्रह नक्षत्रांची हालचाल नियमित सुरु असते आणि जीवनामध्ये सुख दुःखाचे चक्र काय सुरु असते. दुःखा नंतर सुख आणि सुखा नंतर दुःख येत असते त्यामुळे व्यक्तीने प्रतीक सुख दुःख आनंदाने सहन केलं पाहिजे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.