entertenment

हे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात

लोकांना कोडी म्हणजेच कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यात मजा येते. यामुळे त्यांचा थोडा टाईमपास होतो आणि थोडे डोके पण चालवायला लागते. आज आम्ही तुमच्यासाठी अश्याच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेऊन आलेलो आहोत ज्यामुळे तुमचे मनोरंजन होईलच पण हे प्रश्न इतरांना विचारून टाईमपास देखील करता येईल.चला पाहू या पैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्ही 15 सेकंदा मध्ये देऊ शकता.

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी न बोलावता तुमच्या जवळ येते. ती प्रत्येक रूम मध्ये असते पण भाडे देखील देत नाही. आपण तिला पकडू शकत नाही आणि तिला पाहू देखील शकत नाही. आपण तिच्या शिवाय राहू देखील शकत नाही. सांगा पाहू ती कोण आहे?

उत्तर : हवा

प्रश्न : अशी कोणती जागा आहे जेथे जर 100 लोक गेले तर 99 परत येतात?

उत्तर : स्मशान घाट

प्रश्न : असा कोणती बैंग आहे जी फक्त भिजवल्यावरच कामात येते?

उत्तर : टी बैंग

प्रश्न : जर 8 ला अर्ध्ये केले तर 0 आणि 4 व्यतिरिक्त अजून काय उत्तर येईल?

उत्तर : 3

प्रश्न : अश्या गोष्टीचे नाव सांगा ज्यास आग जाळू शकत नाही. शस्त्र कापू शकत नाहीत. पाणी भिजवू शकत नाही आणि मृत्यू तिला मारू शकत नाही.

उत्तर : सावली

प्रश्न : समजा तुम्ही एका बस मधून प्रवास करत आहात ज्यामध्ये 10 प्रवासी अजून प्रवास करत आहेत. पहिल्या स्टॉपवर 2 प्रवासी उतरतात आणि 4 अजून चढतात. दुसऱ्या स्टॉपवर 5 प्रवासी उतरतात आणि 2 चढतात. तिसऱ्या स्टॉपवर 2 प्रवासी उतरतात आणि 3 चढतात. आता सांगा कि बस मध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत आहेत?

उत्तर : 11 (10 प्रवासी आणि 1 तुम्ही )

प्रश्न : काही महिने 31 दिवसांचे असतात पण किती महिने 28 दिवसाचे असतात?

उत्तर : प्रत्येक महिना (28 वा दिवस प्रत्येक महिन्यात येतो )

प्रश्न : कोणता इंग्लिशचा वर्ड आहे जो इंग्लिश मध्ये नेहमी Incorrectly स्पेल केला जातो?

उत्तर : Incorrectly

प्रश्न : एक मीठ मालकाने 10 इंचाचे बूट घातले आहेत आणि त्याची उंची 5’10 आहे. तर सांगा तराजू मध्ये तो काय मोजेल?

उत्तर : मीठ

प्रश्न : तो कोण आहे जो मुका, बहिरा आणि आंधळा आहे पण बोलतो नेहमी खरेच.

उत्तर : आरसा

कमेंट मध्ये सांगा या पैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्ही फक्त 15 सेकंदाच्या अगोदर देऊ शकलात.

ही पोस्ट शेयर करा आणि आपल्या मित्रांना देखील चॅलेंज करा.

आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करण्यास विसरू नका.


Tags
Show More

Related Articles

Back to top button