सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र योग, राशी अनुसार करू शकता पूजा-अर्चना

0
20

21 ऑक्टोबर (सोमवार) आणि 22 ऑक्टोबर (मंगळवार) या दोन दिवशी पुष्य नक्षत्र आहे. 21 तारखेला सोम पुष्य आणि 22 तारखेला भौम पुष्य राहील. हे दिवस खरेदी करण्यासाठी उत्तम मानले जात. ज्योतिषतज्ञ लोकांच्या अनुसार दिवाळीच्या पहिले येणारे पुष्य नक्षत्रात केली जाणारी सगळ्या प्रकारची खरेदी अक्षय फल देणारे असते. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी असतो. शनी वृद्धी करणारा आणि दीर्घ काळ राहणारा ग्रह आहे. त्यामुळे या नक्षत्रात खरेदी केलेली वस्तू दीर्घकाळ राहते आणि फायदा देते. या योगा मध्ये राशी अनुसार पूजा-अर्चना देखील केली पाहिजे. जाणून घेऊ 12 राशीसाठी शुभ काम जे पुष्य नक्षत्राच्या दिवशी केले जाऊ शकतात.

मेष राशी : शिवलिंगावर लाल रंगाचे गुलाब पुष्प अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

वृषभ राशी : शिवलिंगावर आपण चांदीच्या भांड्याने कच्चे दूध अर्पण करावे.

मिथुन राशी : या राशीच्या लोकांनी गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात.

कर्क राशी : या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करून ओम सों सोमाय नमः मंत्र जप करावा.

सिंह राशी : जर आपण सिंह राशीचे व्यक्ती असाल तर आपण सूर्याला जल अर्पण करावे आणि ओम सुर्याय नमः या मंत्राचा जप करा.

कन्या राशी : गणपतीला शमीची पाने अर्पित करावीत.

तुला राशी : आपल्या राशीसाठी भगवान शंकर यांना खीर नैवेद्य दाखवणे हा उपाय आहे.

वृश्चिक राशी : शिजलेल्या भाताने शिवलिंगाचा शृंगार करावा आणि लाल गुलाब पुष्प अर्पण करावे.

धनु राशी : आपण भगवान विष्णूला केळे अर्पण करावे.

मकर राशी : आपण शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत.

कुंभ राशी : आपण पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करावे आणि सात प्रदक्षिणा कराव्यात.

मीन राशी : आपण भगवान शंकराला बेसनाचे लाडूचा प्रसाद अर्पित करावा.