Celebrities
सिंगर मीका सिंह वर लागले गंभीर आरोप, दुबईच्या जेल मध्ये आहे कैद
पंजाबी सिंगर मीका सिंह आणि विवाद यांचे जुने नाते आहे. लोक मीका सिंहला गाण्यांच्यामुळे तर ओळखता पण मीका नेहमी असे काही ना काही करत असतो ज्यामुळे तो नेहमी चर्चे मध्ये असतो. आणि पुन्हा एकदा मीका ने काही केले आहे ज्यामुळे तो चर्चेत आलेला आहे. पण यावेळी समस्या मोठी होऊ शकते.
सध्या मीका सिंह दुबई मध्ये आहे आणि तेथे त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि कारण सांगितले जात आहे ते म्हणजे यौन शोषण. खरतर मीका सिंहवर एक 17 वर्षीय ब्राजीलीयन मुलीने हे आरोप लावले आहेत. परंतु आधिकारिक पणे यागोष्टीची पुष्टी झालेली नाही.
बातम्यांच्या अनुसार मीका सिंह एक कार्यक्रम करण्यासाठी दुबई मध्ये होता. जेथे त्याच्या विरुध्द तक्रार झाली आहे आणि बुधवार रात्री जवळपास तीन वाजता पोलिसांनी त्याला अटक केली. ज्यामुलीने मीकावर हे आरोप लावले आहेत ती एक मॉडल आहे.
युवतीने मीकावर आरोप लावले आहेत कि मीका तिला अश्लील फोटोग्राफ्स पाठवत होता. ज्यामुळे तिने ही तक्रार दाखल केली आहे. सध्या मीकाला तेथून जमानत मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पूर्वी देखील विवादा सोबत राहिले होते नाते
हे पहिल्यांना नाही आहे कि मीका कोणत्या विवादा मध्ये सापडला आहे. अश्या प्रकारचे विवाद पूर्वी देखील झाले आहेत.
सगळ्यात पहिले साल 2006 मध्ये राखी सावंतचा जबरदस्ती कीस केल्याचा विवाद होता, तेव्हा राखी सावंत ने त्याच्या विरुध्द केस दाखल केली होती.
साल 2014 मध्ये हिट एंड रन केस मध्ये देखील मीकाचे नाव केस मध्ये आहे.
साल 2015 मध्ये देखील एका फंक्शन मध्ये डॉक्टरवर हात उचलल्या बद्दल मीका अटक झालेला.
मीकाचा भाऊ दलेर मेंहदी वर आहेत आरोप
मीकाचा मोठा भाऊ दलेर मेंहदी वर देखील मानवी तस्करी केल्याचे आरोप लागले आहेत आणि साल 2018 मध्ये पंजाबच्या पटियाला कोर्टाने दलेरला या बाबतीत दोषी ठरवून दोन वर्षाची सजा सुनावली होती. सध्या तो बेल वर बाहेर आहे.
