money

चोरांनी गाडी चोरण्यासाठी नवीन ट्रिक शोधून काढली आहे, अशी सावधानता दाखवून तुम्ही गाडीला वाचवू शकता

चोरांना आळा घालण्यासाठी पोलिस रोज नवनवीन उपाय योजना करत असतात. तर चोर देखील अनेक वेळा दोन पावले पुढे जाऊन चोरी करण्यासाठी नवनवीन ट्रिक शोधून काढत असतात. अशाच एका ट्रिक बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या ट्रिकचा वापर करून चोर कार चोरत असतात. पाश्चात्य देशांत काही भागांत या ट्रिकचा वापर करून चोरांकडून कार चोरी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ही ट्रिक व्हायरल झाल्याने इतर ठिकाणीही या ट्रिकचा वापर होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून काही संशय आला तर तुम्ही तशी काळजी घेऊ शकता.

चोरांची ट्रिक अशी आहे

चोर तुमच्या कारच्या पुढील चाकाला ड्रायव्हरच्या विरुद्ध दिशेला जे चाक असते त्या चाकाच्या आणि कारच्या गॅपमध्ये रिकामी पाण्याची बाटली फसवतात.

ही बाटली फसवल्याच्या नंतर चोर आजूबाजूला लपून बसलेले असतात. जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसून गाडी सुरू करता आणि चालवायला सुरुवात करता त्यावेळी या अडकवलेल्या बॉटलमुळे अगदी विचित्र असा आवाज येऊ लागतो.

तुमच्या मनामध्ये रिकाम्या बाटलीचा हा आवाज नेमका का येतोय असा प्रश्न उभा राहतो. नेमका आवाज कशाचा हे पाहण्यासाठी तुम्ही गाडीच्या खाली उतरतो.

तुम्ही गाडीला सगळीकडे फिरुन चेक करत असता. यावेळी आपल्या गाडीची चावी मात्र गाडीलाच लावलेली असते.

तुम्ही जेव्हा दुसऱ्या बाजुला येऊन वाकून पाहत असता, तेव्हा हीच संधी साधून चोरटे पटकन गाडीत बसतात आणि चावी लावलेली असल्याने गाडी घेऊन थेट फरार होतात.

चोरांना अगोदरच माहिती असल्याने अत्यंत वेगाने ते हा सर्व प्रकार करतात, अशावेळी आपल्या डोळ्यासमोरून गाडी चोरली जाण्याची परस्थिती निर्माण होते.

फेसबुकचे नियम बदलले आहेत. जर तुम्हाला आमचे लेख नियमित पाहायचे असतील तर पोस्टला लाईक, शेयर किंवा कमेंट करा अन्यथा फेसबुक आमच्या पोस्ट्स तुम्हाला दाखवणार नाहीत.

कशी घ्या काळजी

आपण कधीही गाडीत बसण्यापूर्वी सर्व बाजुने कारचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील धोके टाळता येऊ शकतात.

एकदा गाडीत बसल्यानंतर अशा प्रकारचे काही आवाज आले तरी लगेचच गोंधळून जाऊ नका. आपल्या सोबत किंवा गाडी सोबत काय होत आहे याचा अंदाज घेऊन विचारपूर्वक पुढची पावले उचला.

कधीही आणि काहीही झाले तरी प्रत्येक वेळी गाडीतून खाली उतरताना गाडीची चावी काढायचे कधीही विसरू नका. कारण चावी नसेल तर चोरांना अशा ट्रिकचा काहीही फायदा होणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button