Uncategorized

एका महिलेने गुरूंना प्रश्न केला माझ्या क्रोधी स्वभावामुळे सगळे माझ्या पासून दूर झाले आहेत, मी यास नियंत्रणात कसे करू?

एका लोककथेच्या अनुसार एका गावामध्ये शांती नावाची महिला राहत होती, पण ती अत्यंत क्रोधी स्वभावाची होती. एकदा राग आला कि ती लहान-मोठे काही पाहायची नाही आणि तोंडाला येईल ते बोलत असे. तिचे कुटुंबीय आणि गावातील लोक त्यामुळे वैतागले होते. पण राग शांत झाल्या नंतर त्या महिलेला अपराधीपणाची भावना वाटत असे आणि आपल्या बोलण्याचा पश्चाताप होत असे.

एक दिवस ती गावातील प्रसिद्ध गुरु महात्म्याच्या भेटीला गेली. ती गुरूंना म्हणाली गुरुजी माझ्या क्रोधी स्वभावामुळे सगळे लोक माझ्या पासून दूर झाले आहे. मला स्वतःला सुधारायचे आहे पण मला ते जमत नाही आहे. आपण काही असा उपाय सांगा ज्यामुळे माझा राग शांत होईल.

गुरुजींनी तिला एक बाटली देत म्हंटले कि या औषधाला पाण्यात मिसळून पिण्यामुळे तू रागावर नियंत्रण मिळवू शकशील. जेव्हा तुला राग येईल तेव्हा यास तोंडाला लावून प्यावे आणि तो पर्यंत प्यावे जो पर्यंत राग शांत होत नाही. एका आठवड्यात तू चांगली होशील. शांती ने राग आल्यावर ते औषध पिणे सुरु केले. एका आठवड्यातच तिचा राग कमी होऊ लागला. आनंदी होऊन ती गुरूंना भेटण्यास गेली.

महिला गुरुला म्हणाली गुरुदेव तुमच्या औषधाने चमत्कार केला माझा राग कमी केला. कृपा करून या औषधाचे नाव सांगावे. ज्यामुळे मला एवढा फायदा झालेला आहे त्या औषधीचे नाव मला जाणून घ्यायचे आहे.

गुरु शांतीला म्हणाले त्या बाटली मध्ये कोणतेही औषध नव्हते, सामान्य पाणी होते. राग आल्या नंतर तुझे बोलणे बंद करायचे होते, तुला मौन ठेवायचे होते, यासाठी मी तुला हि बाटली दिली. बाटली तोंडाला लावलेली असल्यामुळे राग आलेल्या वेळी बोलू शकत नव्हतीस, त्यामुळे समोरील व्यक्ती तुझ्या कडू शब्दा पासून वाचत होते. तू गप्प बसल्यामुळे समोरील व्यक्तीने देखील उलट उत्तर दिले नाही. जेव्हा आपण एखाद्याच्या रागाचे उत्तर मौन ठेवून देतो तेव्हा ती गोष्टच समाप्त होते.

कथेतून काय शिकायला मिळाले : या कथेची शिकावण हि आहे कि क्रोध नियंत्रणात करण्याचा सगळ्यात चांगला आणि प्रभावी मार्ग म्हणजे मौन बाळगणे. क्रोध आल्यावर जर आपण नेहमी मौन राहिलो तर आपण वाईट बोलण्या पासून वाचू शकतो. आपला क्रोध म्हणजेच राग शांत करण्यासाठी आपण दररोज मेडिटेशन देखील करू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button