Breaking News
Home / करमणूक / एखाद्या व्यक्तीचे मन दुखावलं गेलं तर या स्टेप्स फॉलो करा, पश्चाताप होणार नाही…

एखाद्या व्यक्तीचे मन दुखावलं गेलं तर या स्टेप्स फॉलो करा, पश्चाताप होणार नाही…

जीवना मध्ये अनेक वेळा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो जे आपले सगळ्यात जास्त जवळचे असतात त्यांच्या सोबत देखील वाद होतात. अश्या स्थिती मध्ये आपण काही असे बोलून जातो कि ज्यामुळे नात्या मध्ये कटुता वाढते. रागाच्या भरात बोललेल्या गोष्टी समस्या वाढवतात. जेव्हा राग शांत होतो तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण चूक केली आहे, ज्या नंतर पश्चाताप होतो. गायत्री परिवार चे संस्थापक पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या अनुसार आपण अश्या परिस्थिती मध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे…

दुसऱ्यांना दोष नाही दिला पाहिजे : वाद-विवादाच्या स्थिती मध्ये स्वतःला क्षमा करण्याच्या अगोदर हे जाणून घेतलं पाहिजे कि आपण काय केलं होत. आपल्या सोबत घडलेल्या घटने बद्दल सविस्तर लिहा आणि त्या गोष्टींना देखील लिहा ज्यामुळे हि स्थिती उत्पन्न झाली होती. दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे टाळलं पाहिजे. असे केल्याने परिस्थिती अजून जास्त बिघडू शकते.क्षमा मागणे सोप्पे नसते, पण आपण आपल्या चुकीची क्षमा लगेच मागितली तर नात्यामध्ये प्रेम टिकून राहते. माफी मागण्याचा पुढाकार हे दर्शवते कि आपल्या कडून चूक झाली आहे आणि आपण त्यासाठी दिलगीर आहोत. अश्या प्रकारे आपण अश्या चुका पुन्हा करण्यापासून वाचू शकतो.

नकारात्मक विचारा पासून दूर रहावे : वाद विवाद झाल्या नंतर क्षमा मागावी आणि समोरील व्यक्तीने आपणास क्षमा केली तर हे प्रकरण तेथेच थांबवावे. कधी-कधी क्षमा मिळाल्या नंतर देखील आपण स्वतः क्षमा करू शकत नाही. स्वतः बद्दल नकारात्मक विचार तयार होतात अश्या स्थिती पासून वाचलं पाहिजे. नकारात्मक विचारा पासून दूर राहावे आपले लक्ष दुसरीकडे केंद्रित करावे. जर आपल्या कडून एखादी चूक झाली आहे तर त्याची क्षमा मागण्यास लाज बाळगली नाही पाहिजे. अनेक लोक केवळ लाज वाटते म्हणून तोंड लपवतात. लोकांच्या समोर जाणे टाळतात. अश्या परिस्थिती पासून स्वतःला वाचवा. आपल्या चुकी नंतर आपण आपल्या जवळील लोकांच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही, आपण लाजतो, घाबरतो, या भीतीला आपल्यावर वर्चस्व करू देऊ नका. लाज बाळगू नका, क्षमा मागा.

About V Amit