People

बूट पॉलिश करणारा हा व्यक्ती महिन्याला कमवतो 18 लाख

आपल्याला लहानपणा पासून शिकवले जाते कि कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कधीकधी आपल्याला आपल्या गरजे अनुसार काम करावे लागते जे आपल्याला करण्याची इच्छा नसते.

वेळ कधीही एक सारखी नसते. असे आवश्यक नाही कि आज ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्याकडे तेवढाच भरपूर पैसा उद्या देखील राहील. वेळ कधीही बदलू शकते आणि व्यक्तीला कधीही कोणतेही काम करावे लागू शकते ज्या बद्दल त्याने कधी विचार देखील केलेला नसेल.

काम कितीही सामान्य असले तरी काही फरक पडत नाही तर ते काम तुम्ही किती चांगले आणि मन लावून करता हे महत्वाचे आहे. जर तुम्ही काम मनलावून केले तर तुमचे नशीब एक ना एक दिवस नक्की तुमची साथ देते आणि प्रगती होतेच. याच मंत्रात आपल्या जीवनाचे सार आहे असे हा बूट पॉलिश करणारा सांगतो. आज हा व्यक्ती बूट पॉलिश करून लाखो कमवत आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्यक्तीची महिन्याची कमाई 18 लाख आहे. अमेरिकेतील मैनहैट्टन शहरात राहणारा डॉन वार्ड नावाचा व्यक्ती बूट पॉलिश करून भरपूर पैसे कमवत आहे आणि या पैश्यातून त्याचे आयुष्य चांगले सुरु आहे.

पहिले वार्ड एक फोटो लैब मध्ये काम करत होता आणि तेथे मिळणारे उत्पन्न त्याला पुरेसे नव्हते. या पैश्यात त्याचा खर्च भागत नव्हता आणि त्यामुळेच त्याने काही वेगळे करण्याचा विचार केला. त्याने रस्त्याच्या किनारी बूट पॉलिश करण्याचे काम सुरु केले.

वार्ड आपल्या कामाने आनंदी आहे. त्याचे म्हणणे आहे कि त्याला हे काम करण्यात भरपूर मजा येते आणि त्याने हे काम आपल्या मित्रांना पाहून सुरु केले होते आणि आज मी चांगले पैसे कमावतो. तुमच्या माहितीसाठी वार्ड बूट पॉलिश करण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरतो.

वार्ड आपल्या दुकाना समोरून जाणाऱ्या लोकांना त्यांच्या खराब बुटा बद्दल वाईट भावना निर्माण करतो. ज्यामुळे लोक त्याच्या कडून बूट पॉलिश करण्यासाठी मजबूर होतात. एका व्यक्तीने त्याला एक दिवस विचारले कि असे लोकांना वाईट बोलून तू पैसे कमवून तू आनंदी कसा राहू शकतोस?

या प्रश्नाच्या उत्तरात वार्ड म्हणाला मासे पकडण्यासाठी जाळे तर फेकावेच लागते. मी देखील तेच करतो. मी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना जोक्स ऐकवतो आणि त्यांच्या सोबत हसतो आणि त्यांना स्वच्छ बूट घालण्यासाठी प्रेरित करतो आणि ते माझ्याकडे आकर्षित होतात. वार्ड म्हणतो कि तो रस्त्याने जाणाऱ्या लोकांना जोक्स देखील सांगतो. ते वार्ड सोबत हसतात आणि वार्ड त्यांना बूट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करतो.

यावरून स्पष्ट होते कि कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते तर ते काम करण्यासाठी मना मध्ये जिद्द आणि इच्छा असली पाहिजे, हे जर असेल तर कोणतेही लहान काम मोठे करणे सोप्पे होते.


Show More

Related Articles

Back to top button