entertenment

पोलिसांनी पकडलेल्या या म्हशीचा गुन्हा ऐकल्या नंतर तुम्ही हसूनहसून लोटपोट व्हाल

नेहमी अपराध्यांना पकडण्यात असफल होणाऱ्या युपी पोलिसांनी यावेळेस तत्परता दाखवून एका म्हशीला अटक केली आहे. आता या म्हशीचा गुन्हा ऐकून तुम्हाला भरपूर हसायला येणार आहे तेव्हा हसण्याच्या तयारीत रहा.

झाले असे की युपी पोलिसांनी या म्हशीला चोरीच्या आरोपा खाली अटक केली आहे. मामला इथेच संपत नाहीत तर पुढील गुन्हा याहून भयंकर आहे. म्हशीने अजून एक गुन्हा केला आहे तो सरकारी संपत्तीला नुकसान पोचवण्याचा. म्हशीचा गुन्हा आहे की वन विभागाने लावलेल्या रोपांना तीने नुकसान पोचवले आहे.

उत्तर प्रदेश मधील पलिया येथील बलदेव वैदिक इंटर कॉलेज मध्ये म्हशीने घुसून तेथे वन विभागाने लावलेल्या झाडांना आणि रोपांना ती नुकसान पोहचवत होती आणि पाने-फुले खात होती. त्यामुळे तेथील कॉलेज प्रशासनाने पोलिसांना बोलावले आणि युपीचे तत्पर पोलीस त्वरित म्हशीला अटक करून घेऊन गेले आणि पोलिस स्टेशन मध्ये बांधले.

पोलिसांचे म्हणणे आहे की म्हशीला सहज जमानत मिळणार नाही, तीच्या मालकाला दंड द्यावा लागेल कारण तीने सरकारी संपत्तीला नुकसान पोचवले आहे.

आता तुम्हीच ठरवा या परस्थितीवर हसावे की रडावे.


Show More

Related Articles

Back to top button