Connect with us

सरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे

Money

सरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन स्कीमच्या पात्रते संबंधीचे नियम प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोणतीही अशी व्यक्ती ज्याचे वय 40 पेक्षा जास्त झालेले आहे किंवा असा कोणीही जो कोणत्याही पेंशन स्कीमचा फायदा पहिलेच घेत आहे. अशी व्यक्ती याचा फायदा घेऊ शकते.

पती पत्नी मधील ज्यास पेंशनचा फायदा मिळत आहे, जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलांना पेंशन मिळू शकत नाही.

सरकारने हि पेंशन स्कीम असंगठित क्षेत्राला नजरेत ठेवून सादर केली आहे. जसेकी घरामध्ये काम करणारे नोकर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, बांधकाम मजूर, कचरा वेचणारे, बिडी बनवणारे, कृषी कामगार इत्यादी लोक याचा फायदा घेऊ शकतात.

दर महिन्याला मिळतील 3 हजार रुपये

सरकार या स्कीम अंतर्गत सब्सक्राइबरला 3 हजार रुपये मासिक पेन्शन देईल.

संबंधित व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये पेक्षा जास्त नसले पाहिजे.

सरकार आणि सब्सक्राइबर दोघेही एक सामान अमाउंट पेंशनसाठी देतील.

15 फेब्रुवारी पासून स्कीम लागू होईल.

हि स्कीम 15 फेब्रुवारी 2019 पासून काम करणे सुरु करणार.

अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीकडे सेविंग बैंक अकाउंट आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

व्यक्तीचे वय 18 वर्षा पेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरु कराल तेवढे कमी पैसे जमा करावे लागतील.

जर एखादा व्यक्ती अगोदरच नेशनल पेंशन स्कीम (NPS) चा लाभ घेत असेल तर तो या स्कीमचा लाभ घेऊ शकत नाही.

पेमेंट देण्यास विलंब झाल्यास सब्सक्राइबर लेट पेनाल्टी सोबत पैसे जमा करू शकतो.

अकाउंट ओपन झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत जर बाहेर आले तर त्याने जमा केलेले पैसे त्यास परत केले जातील. या दरम्यान जे व्याज जमा होईल ते देखील त्यास मिळेल.

पती किंवा पत्नी पैकी कोणाचाही मृत्यू झाला तर त्याचा पार्टनर स्कीम पुढे सुरु ठेवू शकतो. पार्टनरला वाटल्यास आपला शेयर घेऊन स्कीम सोडू देखील शकतो. दोघांचा मृत्यू झाल्यास पैसे परत फंड मध्ये जमा होतील.

60 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळणे सुरु होईल.

जर 18 वर्षाच्या व्यक्तीने हि स्कीम सुरु केली तर त्यास दरमहिन्याला 55 रुपये जमा करावे लागतील.

तर 40 वर्षाच्या व्यक्तीने स्कीम सुरु केली तर त्यास दरमहिन्याला 200 रुपये जमा करावे लागतील.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Advertisement
To Top