प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना 2019 | PM Kisan Samman Nidhi Yojana in Marathi 2019

0
149

शेतकऱ्यांची मदत होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेट मध्ये एका योजनेची घोषणा केली आहे, जे छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करेल, हि योजना कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन सुरु केली आहे. यामुळे देशातील गरीब शेतकऱ्यांना चांगला लाभ प्राप्त होईल. या योजनेची माहिती या पोस्ट मध्ये देत आहोत.

योजनेची माहिती

क्र.म. योजनेचे महत्वाचे मुद्दे योजनेची माहिती
1. योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना
2. योजनेची घोषणा आम बजट 2019 च्या दरम्यान
3. योजनेची घोषणा यांनी केली पीयूष गोयल
4. एकूण लाभार्थी 12 करोड़ गरीब शेतकरी
5. लाभ 6000 रूपये प्रतिवर्ष
6. एकूण बजट 75,000 करोड़ रूपये
7. ऑनलाइन पोर्टल pmkisan.nic.in
8. पहिले चरण 1/12/2018-31/3/2019
9. दूसरा चरण 31/5/2019

प्रधानमंत्री किसान सम्मान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana Important points)

 • उद्देश्य : मोदी सरकारने आपल्या बजेट मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या अगोदर झालेल्या शेवटच्या बजेट मध्ये एनडीए सरकार ने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
 • लाभ : योजनेच्या अनुसार गरजू शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी हि योजना आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल, ज्याचा वापर ते शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी करू शकतात.
 • लक्ष्य : योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होईल. यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या आत्म-हत्येचा दर देखील कमी होईल.
 • आर्थिक मदतीची रक्कम : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 2019 च्या बजेट मध्ये सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये 100% खर्च केंद्र सरकार करेल.
 • डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा : या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जातील. त्यासाठी शेतकऱ्यांना इकडे तिकडे फिरावे लागणार नाही. योग्य आणि रजिस्टर शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार सरळ पैसे जमा करेल.
 • बजेट : पीएम किसान आय सहायता योजनेसाठी 75 हजार करोड रुपयांचे बजेट सरकार 2019-20 वर्षांसाठी देत आहे. या व्यतिरिक्त वित्त वर्ष 2018-19 साठी देखील 20 हजार करोड रुपायांचे बजेट दिले गेले आहे. म्हणजेच एकूण बजेट 95 हजार करोड रुपयांचे झाले आहे.
 • एकूण लाभार्थी : किसान सम्मान निधी योजने द्वारे पूर्ण देशात जवळपास 14.5 करोड शेतकऱ्यांना फायदा मिळेल.
 • योजनेची सुरुवात – गोयल यांनी बजेट मध्ये माहिती देताना सांगितले कि पीएम किसान सम्मान निधी योजनेत 1 डिसेंबर 2018 पासून लागू राहील, यासाठी सरकारने 2018-19 वर्षांसाठी अतिरिक्त बजेट निश्चित केले आहे.
 • केंद्र सरकार ने त्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्याची घोषणा केली आहे जे नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित आहेत त्यांना सरकार काही मदत करेल.
 • जे शेतकरी वेळेवर आपले कर्ज परत करत आहेत, त्यांना सरकार पुरुस्कृत करून त्यांचा सम्मान करेल. ज्यामुळे इतर शेतकरी देखील वेळेवर कर्ज परत फेड करण्यासाठी प्रोत्साहित होऊ शकतील.
 • योजनेत दिले जाणारी आर्थिक मदत येणाऱ्या काळात वाढवली जाऊ शकते. सरकारकडे पैसे आले कि हि रक्कम वाढवली जाऊ शकते.

पीएम किसान सम्मान निधी योजनेत मिळणाऱ्या रक्कमेची माहिती (PM Kisan Samman Nidhi Yojana Installments Details)

 • हे 6000 रुपये शेतकऱ्यांना 3 चरणामध्ये मिळतील. प्रत्येक चरणात 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला सरकार तर्फे 500 रुपये देईल.
 • सरकार ने सांगितले आहे कि योजने अंतर्गत मिळणारी पहिली इंस्तोलमेंट 31 मार्च 2019 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना दिली जाईल.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना पात्रता (Farmers Income Support Scheme Eligibility Criteria)

 • पीएम किसान योजने अंतर्गत आता सगळ्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊन आपल्या आश्वासना प्रमाणे या योजनेचे लाभ शेतकऱ्यांना देणार. अगोदर या योजनेचा फायदा त्याच शेतकऱ्यांना मिळणार होता ज्यांच्या जवळ 5 एकर पर्यंत जमीन होती. पण आता सरकारने हा नियम रद्द केला आहे.
 • योजने मध्ये भारताचे नागरिक सहभागी होऊ शकतात. भारतामध्ये कोणत्याही प्रदेशात राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार.
 • शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी बैंक अकाउंट असणे आवश्यक आहे. ज्यांचे बैंक अकाउंट नसेल त्यांना अकाउंट उघडावे लागेल.
 • सरकार ने छोट्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यास सांगितले आहे. कुटुंबाचा अर्थ पती-पत्नी आणि अल्पवयीन मुले. या एका कुटुंबाकडे टोटल 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल तेव्हाच त्यांना योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत मिळेल.

प्रधानमंत्री योजने अंतर्गत अपात्र (Not Eligible for PM Kisan Yojana)

 • जे कर भरतात ते शेतकरी सम्मान निधी योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत.
 • केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये कोणत्याही मंत्री पदावर कार्यरत शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत.
 • सरकारी नोकरी मध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त देखील या योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही.
 • ज्यास 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेंशन आहे त्यांना या योजने पासून वंचित ठेवले गेले आहे.
 • डॉक्टर, इंजीनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटेंट, आणि आर्किटेक्ट देखील या योजने पासून वंचित राहतील. सरकार यांना किसान निधी योजनेचा लाभ देणार नाही.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

 • पीएम किसान योजनाच्या पहिल्या चरणासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही आहे, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणासाठी अनिवार्य आहे.
 • लाभार्थीला आपली ओळख पटवण्यासाठी इतर ओळखपत्र जसे वोटर आईडी, ड्राइविंग लाइसेंस, नरेगा कार्ड दाखवणे आवश्यक आहे. यांच्या संबंधित सगळे कागदपत्रे आपल्या जवळ असते आवश्यक आहे.
 • लाभार्थी आपल्या बैंक खात्याची माहिती, खाता क्रमांक, आईएफएससी कोड देणे आवश्यक आहे, सोबतच बैंक पासबुकची प्रत जमा करावे लागेल.
 • पहिल्या चरणामध्ये मोबाईल नंबर देणे अनिवार्य नाही आहे, पण पुढील चरणामध्ये हे आवश्यक आहे. लाभार्थ्याला मोबाईल नंबरची माहिती अधिकाऱ्यास द्यावी लागेल, जेणे करून ते डाटा मध्ये अपडेट करू शकतील. ज्यामुळे वेळेवर योजनेच्या संबंधित माहिती मोबाईलवर मिळू शकेल.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आवेदन फॉर्म प्रक्रिया (PM Kisan Samman Nidhi Yojana Application Form Process)

 • पीएम किसान सम्मान योजना आपल्या वेगळ्या पोर्टलवर लाँच केली आहे. http://pmkisan.nic.in/Home.aspx
 • या पोर्टलवर राज्य सरकार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करेल, ज्याच्या आधारे केंद्र सरकार सम्मान निधी पोर्टल मधून शेतकऱ्यांची लिस्ट सादर करेल.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी सूची कशी पाहावी (How to check PM Kisan Samman Nidhi Scheme Beneficiary List 2019)

 • प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2019 अंतर्गत लाभार्थी सूची अधिकृत वेबसाईट वर 26 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध केलेली आहे. आता या सूची मध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे शेतकरी पाहू शकतात. यासाठी खालील पध्दत वापरू शकता.
 • सगळ्यात पहिले लाभार्थीला पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • या नंतर वेबसाईटच्या होम पेजवर आपल्याला सगळे विकल्प दिसतील. येथे ‘एलजी डायरेक्टरी’ पर्याय निवडावे लागेल.
 • या पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो त्यांच्या स्क्रीनवर दिसेल तेथे आपल्याला 2 अजून पर्याय दिसतील. एक रुरल म्हणजेच ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी.
 • यामध्ये जर आपण ग्रामीण भागातील असाल तर रूरल निवडावे आणि शहरी भागातील शेतकरी असाल तर अर्बन वर क्लिक करा.
 • आता आपल्या समोर एक बटन दिसेल ज्यावर ‘गेट डेटा’ लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा.
 • जर शेतकरी ग्रामीण क्षेत्रातील असेल तर त्याच्या समोरील पेजवर राज्य, जिल्हा, उपजिल्हा किंवा तहसील किंवा ब्लॉकचे नाव या नंतर गावाचे नाव निवडावे. जर शहरी भागातील असाल तर राज्य, जिल्हा, टाऊन आणि आपला वार्ड नंबर निवडा.
 • सगळी माहिती भरल्यानंतर शेवटी ‘सबमिट’ बटन वर क्लिक करा, यानंतर आपल्यासमोर लाभार्थी सूची दिसेल, आणि यामध्ये ते आपले नाव शोधू शकतात.
 • या पद्धतीने या योजनेच्या लाभार्थींची सूची आपण घरबसल्या पाहू शकता आणि आपले नाव त्यामध्ये समाविष्ट आहे किंवा नाही हे चेक करू शकता.

इतर माहिती

जर एखाद्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्यता योजना सुरु असेल तर तेथील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य दोन्ही योजने अंतर्गत आर्थिक लाभ मिळेल.

सरकार ने अगोदर शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या आपल्या योजना बंद केल्या नाही आहेत तर शेतकऱ्यांना अजून जास्त लाभ देण्यासाठी ही नवी योजना लागू केली आहे.

केंद्र सरकार ने सगळ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगितले आहे कि त्यांच्या जवळ जे शेतकऱ्यांचे लैंड रिकॉर्ड आहेत ते तयार ठेवावेत, केंद्र सरकार यांच्या मदतीने नवीन सूची तयार करेल. कृषी अधिकाऱ्यांनी हे सांगितले आहे कि 1 फ्रेब्रुवारी 2019 पर्यंत ज्यांच्या नावे जमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ होईल.

पात्र शेतकऱ्यांनी या योजनेला फायदा आवश्य घेतला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची ही आता पर्यंतची सगळ्यात मोठी भेट आहे. सरकारने सांगितले आहे कि येणाऱ्या काळात योजने मध्ये अजून बदल केले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here