Connect with us

या 6 झाडांच्या साली आरोग्यासाठी आहे अत्यंत गुणकारी ज्याचे मोल तुम्ही कितीही पैश्यांनी खरेदी करू शकत नाही

Food

या 6 झाडांच्या साली आरोग्यासाठी आहे अत्यंत गुणकारी ज्याचे मोल तुम्ही कितीही पैश्यांनी खरेदी करू शकत नाही

वैज्ञानिक दृष्टीने वृक्ष आणि मानव हे नेहमी एकमेकांना पूरक असे राहीले आहे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देते आणि कार्बनडाय ऑक्साईड घेते. सर्वात महत्वाचे म्हणजे वृक्ष आपल्याला अनेक उपयोगी फायदे देते. अनेक वृक्ष असे आहेत जे आपल्याला औषधी म्हणून वापरात येतात. चला आज आपण अश्याच काही औषधी गुण असलेल्या वृक्षांची माहीती घेऊ.

6 वृक्षांच्या सालीचे चमत्कारीक फायदे

अर्जुन : अर्जुन वृक्ष भारतातील एक औषधी वृक्ष आहे. याला घवल, ककुभ किंवा नदीसर्ज पण म्हणतात. या वृक्षाची साल वेगवेगळ्या पद्धतीने वापरात आणून अनेक गंभीर आजार दूर केले जाऊ शकतात. एक ते दिढ चमचे अर्जुनच्या सालीची पावडर, 2 ग्लास पाण्यात तो पर्यंत उकळवा जो पर्यंत पाणी अर्धे होत नाही. यानंतर हे पाणी थंड होऊ द्या. दररोज सकाळ-संध्याकाळ 1 ते 2 ग्लास प्यावे. यामुळे ब्लॉक झालेल्या धमन्या खुलतील आणि कोलेस्ट्रोल कमी होईल. दररोज अर्जुनच्या सालीचे चूर्ण पासून बनलेले चहा प्यावा. अर्जुन सालीची पावडर कपड्याने गाळून घ्यावी हे चूर्ण जिभेवर ठेवून चाटल्यास हृदयाची अनियमितता नियमित होऊ लागते. या सोबत सकाळी अर्जुन सालीचा काढा पिण्यामुळे रक्तपित्त दूर होते. ही साल मेहंदी मध्ये मिक्स करून केसांना लावल्यास सफेद केस काळे होतात.

कडुलिंब : कडुलिंब या झाडाची साल त्वचा रोगासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्वचेवर होणाऱ्या फोड्या, दाद, खुजली इत्यादी मध्ये या सालीचा वापर होतो. यासाठी साल पाणी टाकून दगडावर घासावी आणि लेप तयार करावा तो संक्रमण झालेल्या जागी लावावा. जेवण करण्या अगोदर 1-1 चमचा चूर्ण घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.

बबुल : बबुल रुक्ष औषधी गुणांनी भरलेला आहे. हे तोंडाच्या आजारासाठी लाभदायक आहे. हे स्त्री आणि पुरुषाची प्रजनन शक्ती वाढवते. 20 ग्राम बबुलची साल 400 मिलीलीटर पाण्यात उकळवून 100 मिलीलीटर बनवा. हा काढा दिवसातून 3 वेळा पाजल्यामुळे मासिक-धर्म मध्ये जास्त रक्त जाने बंद होते. त्वचा भाजल्यास बारीक पावडर नारळाच्या तेलात मिक्स करून भाजलेल्या जागी लावावी यामुळे जळजळ कमी होईल आणि भाजल्याचे डाग होणार नाहीत. बबुल सालीच्या पावडरला पाण्यात टाकून उकळावे आणि या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तोंडाचे विकार दूर होतात.

गजपीपली : गजपीपली ची साल वजनाला जड असते. अतिसार मध्ये ही साल उपयोगी होते. एखादी जखम झाली असेल तर त्यावर साल पावडर करून लावल्यास जखम लवकर भरते. हिच्या पावडरी पासून बनवलेला लेप लावल्यामुळे हाड मोडल्यामुळे होणारी वेदना, मार, चमक, सूज, संधिवात, सायटिका आणि कंबरदुखी ठीक होते.

अशोक : मान्यते नुसार अशोक वृक्षाला शोक नाश करणारा वृक्ष म्हंटले जाते. या वृक्षाची खाली बसल्यामुळे दुखः नष्ट होते. याचे औषधी गुण सुध्दा आहेत. अशोक ची साल आणि पुष्प सम प्रमाणात सकाळी पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून प्यावे. यामुळे रक्त युक्त मुळव्याध दूर होते. अशोकच्या सालचे 40 ते 50 मिलीलीटर काढा पिण्यामुळे मुळव्याध मध्ये रक्त वाहने बंद होते. फोडे झाले असल्यास सुध्दा साल पाण्यात उकळून काढा बनवा, यामध्ये थोडे राई तेल मिक्स करून लावल्यामुळे लवकर फरक पडतो. याशिवाय महिलांच्या संबंधीत समस्ये मध्ये चूर्ण मध्ये खडीसाखर मिसळून गाईच्या दुधा सोबत 1 चमचा घ्यावे.

वटवृक्ष : वटवृक्ष हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. त्याच प्रमाणे याचे औषधी उपाय ही भरपूर आहेत. याच्या पानांना आणि पाराम्ब्याचा लेप बनवून त्वचेवर लावल्यास फायदा होतो. या वृक्षाची साल सावली मध्ये सुकवून याचे चूर्ण खडीसाखर आणि गाईच्या दुधा सोबत खाण्यामुळे स्मरण शक्ती वाढते. साल आणि पारंब्याचे चूर्ण मधुमेह दूर करते. याच्या पानांची राख जवसच्या तेला मध्ये मिक्स करून डोक्यावर लावल्यामुळे डोक्यावर केस उगवतात. दातदुखी मध्ये याचे दुध लावल्यामुळे वेदना दूर होतात आणि दुर्गंधी दूर होऊन दात ठीक होतात आणि किडे नष्ट होतात. तोंडाची जळजळ, तोंड येणे, हिरड्यांची जळजळ व सूज अश्या समस्येत सालीचे 2-5 ग्राम चूर्ण सकाळ-संध्याकाळ पाण्यासोबत घ्यावे. एक महिना असे केल्याने फायदा होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 7 रात्र चेहऱ्यावर हे लावा किती ही जिद्दी दाग-धब्बे असतील ते निघून जातील

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top