Connect with us

या जडीबुटी मध्ये अनेक आजार दूर करण्याची शक्ती आहे, जाणून घ्या याच्या सर्वोतम उपायाची माहिती

Health

या जडीबुटी मध्ये अनेक आजार दूर करण्याची शक्ती आहे, जाणून घ्या याच्या सर्वोतम उपायाची माहिती

जर तुम्ही अश्या जडीबुटीचा शोध घेत असाल जी तुमच्या आरोग्याच्या बहुतेक सर्व समस्यांवर उपाय म्हणून काम करेल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच एका जादुई जडीबुटी बद्दल माहिती सांगणार आहोत. या जडीबुटीचे नाव गुळवेल आहे. ही एक प्रकारची वेल असते. गुळवेलचे आयुर्वेदा मध्ये भरपूर महत्व आहे. गुळवेलचे हिंदी मधील नाव गीलोय असे आहे.

चला पाहू गुळवेलचे फायदे

जर एखाद्याला व्यक्तीला बद्धकोष्ठता त्रास देत असेल तर यासाठी गुळवेलाचे चूर्ण २ चमचे गुळाच्या सोबत सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

मुळव्याध म्हणजेच पाइल्सच्या रुग्णांना जर गुलवेलचा थोडासा रस ताका सोबत मिक्स करून दिल्यास रुग्णाला आराम मिळतो.

जर तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले असेल तर गुलवेलचा रस नियमित घेतल्यामुळे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच गुलवेल मधुमेहा मध्ये फायदेशीर आहे.

हाई ब्लडप्रेशर मध्ये सुध्दा गुलवेल फायदेशीर आहे. गुलवेल शरीराचा रक्तदाब नियमित करते.

गुलवेल दीर्घकाळा पासून येत असलेला ताप (ज्वर) बरे करण्यास मदत करते. गुलवेल मध्ये तापाचा प्रतिकार करण्याचे गुण असतात. ही आपल्या रक्तातील प्लेटलेट्स ची मात्रा वाढवते जे कोणत्याही प्रकारच्या तापा सोबत लढण्यास मदत करते. डेंगू सारख्या तापात देखील गुलवेलचा रस अतिक्षय उपयोगी ठरला आहे. मलेरियाच्या उपचारासाठी गुलवेलचा रस आणि मध सम प्रमाणात रुग्णास दिले गेल्यास मलेरियाचा इलाजामध्ये मदत मिळते.

गुलवेल आपल्या लीवर तसेच किडनी मध्ये असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. गुलवेल आपल्या शरीरात आजारामुळे होणाऱ्या किटाणूचा सामना करतात आणि लीवर तसेच मुत्र संक्रमणा पासून आपल्या शरीराची सुरक्षा करतात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top