Breaking News

या चमत्कारी फुलाच्या वापराने घरात येऊ लागतात पैसे, होते बरकत

आपल्या जीवनात वनस्पती किती महत्त्वाची आहेत हे आपल्याला माहित असलेच पाहिजे.आपल्याला झाडापासून फक्त ऑक्सिजन मिळत नाही तर सोबतच फळं, फुले आणि सावली देखील मिळते. झाडाचा प्रत्येक भाग आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. वृक्ष वनस्पती आयुर्वेदिक उपचारांमध्ये देखील वापरली जातात. एवढेच नाही तर झाडामध्ये वाढणारी काही फुले आपल्या धनलाभासाठी उपयुक्त आहेत. यातील एक नागकेसरचे फूल आहे. नागकेसरची वाळलेली फुले औषधे आणि मसाले तयार करण्यासाठी देखील वापरली जातात. हे मेहंदीच्या रोपट्या प्रमाणे दिसते.

नागकेसर चे फूल

हे फूल केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर धनलाभसाठी देखील खास मानले जाते. नागकेसरचा उपयोग माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करता येतो. नागकासर फुलाचे उपाय जाणून घेऊ. नागकेसरचा घरातील संपत्ती वाढवण्यासाठी वापरला केला जातो. याच्या वापरामुळे घरात अफाट संपत्ती येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात.

धनलाभ करण्यासाठी उपाय

नागकेसर फुल एका छोट्याशा डब्यात मध भरून शुक्ल पक्षाच्या रात्री किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर आपल्या तिजोरी मध्ये किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी आपल्या घरात ठेवा. तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. तुम्हाला कधीही धनलाभ होऊ शकेल.

शुक्रवारी, नागकेसराचे फुल घेऊन भगवान शंकराच्या समोर त्याचे पूजन करा. पूजा झाल्यानंतर स्वच्छ पांढर्‍या रंगाच्या कपड्यात लपेटून घ्या. भगवान शिवाला प्रथम कच्चे दूध, दही, तूप आणि गंगाजल अर्पण करा, आता यास दुकानाच्या तिजोरी मध्ये, कार्यालय किंवा कोणत्याही पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. या उपायांनी संपत्ती वाढेल.

पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही दररोज शिवलिंगावर नागकेशर चे फळ अर्पण करावे. याचा तुम्हाला फायदा होईल. शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी, ते आपल्या घरी आणा आणि तिजोरीमध्ये ठेवा. याचा तुम्हाला धनलाभ होईल आणि घरात बरकत येईल.

जर आपण व्यापारी असाल तर नागकेसरचे फूल आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोणत्याही शुभ दिवशी निर्गुंजी, नाग केशराची फुले व पिवळी मोहरी एका छोट्या कपड्यात बांधा आणि दुकानाच्या बाहेर लटकवा. असा उपाय केल्यास आपला व्यवसाय वाढेल. आपले धनवृद्धी होईल.

प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्याची तिजोरी कधी रिकामी नसावी आणि पैसे नेहमीच भरले असावेत. यासाठी आपण नागकेशरचे फुल, हळद, सुपारी, एक सिक्का, तांब्याचा तुकडा आणि तांदूळ कपड्यात बांधून लक्ष्मीमाते समोर ठेवा. यानंतर खर्‍या भक्तिभावा ने देवी लक्ष्मीची पूजा करावी. आता यास तिजोरीत ठेवा. आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.