अनेक समस्यांना मिनिटात दूर करते 5 रुपयांची पेट्रोलियम जेली, जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणा येतो आणि या कोरडेपणा पासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक महागड्या क्रीमचा वापर करतात. पण काही वेळातच या क्रीमचा परिणाम संपतो आणि कधीकधी तर फक्त 15 मिनिटातच त्वचा पुन्हा कोरडी होते. जर आपली त्वचा देखील हिवाळ्यात म्हणजेच थंडीमध्ये कोराडी होते तर आपण महागड्या क्रीम ऐवजी 5 रुपयांचे पेट्रोलियम जेली वापरू शकता. पेट्रोलियम जेली लावल्याने त्वचेवर दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो आणि त्वचा टवटवीत दिसते. त्वचेला ओलावा देण्याच्या व्यतिरिक्त पेट्रोलियम जेली पासून इतर दुसरे फायदे देखील मिळू शकतात ते पुढील प्रमाणे आहेत.

पेट्रोलियम जेलीच्या मदतीने भुवई म्हणजेच eyebrow दाट करता येऊ शकतात. त्यामुळे ज्या महिला घनदाट आणि जाड आयब्रो मिळवू इच्छितात त्यांनी पेट्रोलियम जेली लावली पाहिजे. रोज रात्री झोपतांना यास व्यवस्थित आयब्रो वर लावल्याने आयब्रो घनदाट होतात आणि यामध्ये चमक येते. त्यामुळे सुंदर आयब्रो मिळवण्यासाठी आपण त्यावर पेट्रोलियम जेली लावू शकता.

हिवाळ्यात लोकरी कपडे वापरल्याने त्वचेवर रैशेज होतात किंवा फोड्या, दाने निघतात. पण या रैशेज वर जर पेट्रोलियम जेली लावली तर हे रैशेज एका दिवसातच चांगले होतात. या व्यतिरिक्त लोकरी कपडे परिधान करण्याच्या अगोदर त्वचेवर पेट्रोलियम जेली लावल्याने रैशेज होत नाहीत.

हिवाळ्याच्या दिवसात वाहणाऱ्या हवेमुळे ओठाची त्वचा कोरडी होते आणि फाटते. जर आपले ओठ देखील थंडीमुळे खराब होत असतील तर त्यावर पेट्रोलियम जेली लावली पाहिजे. पेट्रोलियम जेली लावल्याने ओठ फाटत नाहीत आणि फाटलेले ओठ चांगले होतात. ओठाच्या प्रमाणे पायावर देखील पेट्रोलियम जेली उपयोगी आहे यास टाचेवर लावल्याने त्या मुलायम राहतात.

पेट्रोलियम जेलीच्या मदतीने मेकअप सहज काढता येऊ शकतो. मेकअप काढण्यासाठी आपण चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली व्यवस्थित लावा. नंतर कपड्याच्या मदतीने त्यास स्वच्छ करा. असे केल्याने मेकअप चेहऱ्यावरून एकदम स्वच्छ होतो आणि त्वचा मुलायम, कोमल राहते.

जर आपले केस निर्जीव दिसतात आणि कोरडे राहतात तर आपण यावर पेट्रोलियम जेली लावा. रात्री झोपण्याच्या अगोदर थोडी पेट्रोलियम जेली केसांना चोळा. पेट्रोलियम जेली लावल्याने केसातील कोरडेपणा दूर होईल आणि त्यावर चमक येईल.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी पेट्रोलियम जेली चेहऱ्यावर लावा. आपण थोडी पेट्रोलियम जेली आपल्या गालांवर आणि कपाळावर लावावे. यास लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येईल आणि चेहरा चमकदार दिसेल.

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घेतल्या नंतर आपण याचा वापर सुरु करालच असे वाटते. आपल्याला पेट्रोलियम जेली बाजारात सहज उपलब्ध होते. त्यासाठी आपल्याला शोधा शोध करण्याची गरज पडणार नाही.