money

पेट्रोल पंप वाले या 12 पद्धतीने देतात तुम्हाला धोखा, नेहमी या गोष्टींकडे लक्ष ठेवा

निवडणूक काळामध्ये पेट्रोल आणि डीझेलचे दर हे स्थिर ठेवण्यात येतात ज्यामुळे त्यांना राजकीय नुकसान होणार नाही याची ते काळजी घेतात. एकदा का निवडणूक आटोपल्या की वेगाने किमती वाढवल्या जातात. त्यात भर म्हणजे पंपवाले ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे विनाकारण भरडला जातो तो सामान्य माणूस त्याला समजत देखील नाही की त्याचा खिसा रिकामा केला जात आहे. पण थोडी सतर्कता दाखवल्यास पंप चालका कडून होणाऱ्या फसवणूकी पासून आपली सुटका करणे शक्य आहे यासाठी तुम्हाला खाली गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. परंतु सरकार कडून होणाऱ्या दरवाढीला मात्र सहन करावेच लागेल कारण सध्यातरी त्यावर उपाय नाही.

खालील गोष्टींकडे लक्ष ठेवून पंप चालक करत असलेली फसवणूक थांबवता येईल

नेहमी रिजर्वच्या अगोदर भरा पेट्रोल

अत्यंत कमी लोकांना माहित आहे कि रिकाम्या टैंक मध्ये पेट्रोल भरल्याने नुकसान होते. याचे कारण आहे की जेवढा टैंक रिकामा असेल तेवढी जास्त हवा टैंक मध्ये असते. त्यामुळे तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा हवे मुले पेट्रोलचे प्रमाण कमी मिळते. त्यामुळे कमीतकमी गाडी रिजर्व वर जाण्या पर्यत वाट पाहू नका त्या अगोदरच पेट्रोल भर. अर्धा टैंक नेहमी भरलेला ठेवा.

डीजीटल मीटर असलेल्या पंपवरच पेट्रोल भरा

नेहमी पेट्रोल डीजीटल मीटर असलेल्या पंपवर भर. कारण जुन्या पेट्रोल पंप मशीनवर कमी पेट्रोल मिळण्याची जास्त शक्यता असते आणि यास पकडणे कठीण आहे. हेच कारण आहे कि देशातील जुन्या पेट्रोल पंप मशीनला बदलून डीजीटल मशीन लावल्या जात आहेत.

थांबून-थांबून चालत असेल मीटर

तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल कि पेट्रोल भरताना मीटर सतत थांबतो. खरतर हळूहळू करून याप्रकारे पेट्रोल दिले जाते. तज्ञांचे मत आहे कि सतत थांबल्यामुळे पेट्रोल कमी मिळते. यामुळे जर एखादी पंपवर अशी मशीन असेल तर तेथे पेट्रोल भरू नये.

मीटरवर सतत नजर ठेवा

अनेक लोक पेट्रोल/डीझेल भरताना गाडी खाली उतरत नाहीत. याचा फायदा  पंप कर्मचारी घेतात. पेट्रोल भरताना गाडीखाली उतरावे आणि मीटर जवळ उभे राहावे आणि कर्मचारी काय करत आहे यावर लक्ष ठेवावे. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

नेहमी जीरो पाहून पेट्रोल भरावे

होऊ शकते कि तुम्हाला गप्पांमध्ये गुंतवून कर्मचारी जीरो तर दाखवेल पण तुम्ही सांगितलेली किंमत सेट करणार नाही. आजकाल बहुतांश पेट्रोल पंप डीजीटल असतात. यामध्ये तुम्ही सांगितलेली किंमत पहिलेच सेट केली जाऊ शकते. यामुळे पेट्रोल पंप चालकांची मनमानी आणि चीटिंग कमी होईल.

रीडिंग या आकड्या पासून स्टार्ट होते का?

पेट्रोल पंप मशीन वर जीरो फिगर तर तुम्ही पाहिला पण रीडिंग स्टार्ट कोणत्या फिगर ने होते. सरळ 10, 15 किंवा 20 अंकाने. मीटरची रीडिंग कमीतकमी 3 पासून सुरु व्हावी. जर 3 पेक्षा जास्त अंकावर रीडिंग जंप झाले तर समजा तुमचे तेवढे झाले.

जर वेगाने मीटर चालत असेल

तुम्ही पेट्रोल ऑर्डर केले आणि मीटर वेगाने चालत असेल तर समजावे कि काहीतरी गडबड आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मीटरची स्पीड नॉर्मल करण्यास सांगावे. होऊ शकते वेगाने मीटर चालल्यामुळे तुमचे नुकसान होत असेल.

माईलेज चेक करत राहावे

पेट्रोल चोरण्यासाठी बऱ्याचदा पंप मालक मीटर मध्ये पहिलेच हेराफेरी करून ठेवतात. नियमानुसार पेट्रोल मशीन मध्ये बिघाड झाल्यास तेल कंपनीचे मैकेनिक त्यास दुरुस्त करू शकतात पण पंप मालक प्राईवेट मैकेनिक आणून मशीन मध्ये गडबड करतात. यासाठी वेगवेगळ्या पंपवर पेट्रोल भरून माईलेज चेक करावे.

चेक करा पाईप मध्ये पीळ तर नाही

तेल भरताना गाडी मशीन पासून दूर उभी करावी ज्यामुळे पाईप मध्ये पीळ पडणार नाही आणि तो सरळ राहील ज्यामुळे पाईप मध्ये पेट्रोल वाया जाणार नाही.

राउंड फिगर रक्कमचे तेल भरू नये

अनेक लोक 500, 1000 किंवा 2000 चे पेट्रोल/डीझेल भरतात. परंतु पेट्रोल पंप मालक अश्या रक्कमेसाठी पहिलेच मशीन मध्ये फिक्सिंग करून ठेवतात. यासाठी चांगले राहील जर राउंड फिगर मध्ये पेट्रोल भरले नाही तर. उदाहरणार्थ 530 रुपये किंवा 1740 रुपये अश्या वेगळ्या रक्कमेचे पेट्रोल भरले तर चोरी कठीण होईल आणि तुमचे नुकसान होणार नाही. यासाठी तुम्ही कार्ड पेमेंट करू शकता.

तेल एवजी हवा तर नाही भरत तुम्ही

टाकी फुल करताना ऑटो कट झाल्यावर पेट्रोल पंपवाले राउंड फिगर मध्ये पेट्रोल भरण्याची गोष्ट करतात. यासाठी तयार होऊ नका कारण ऑटो कट झाल्यावर बऱ्याचदा तुमच्या गाडीच्या टाकी मध्ये कमी तेल जाते आणि अनेक वेळा मशीन रिसेट न झाल्यामुळे तेल जात नाही फक्त हवा गाडीच्या टाकीमध्ये जाते.

तक्रार करणे विसरू नका

जर तुम्हाल पेट्रोल चोरीचा थोडाही शक असेल तर पंप मैनेजर कडून तक्रार पुस्तक मागून तक्रार करावी. जर कम्प्लेंट बुक देण्यास नकार दिल्यास कंपनीच्या कस्टमर केयर मध्ये तक्रार करावी.


Show More

Related Articles

Back to top button