Uncategorized

या मगरी वर जीवापाड प्रेम करत होते गावातील लोक, शेवटी त्याच्या मृत्युनंतर का ढसाढसा रडले लोक

सामान्य पणे आपल्याला एखादा हिंस्र प्राणी दिसला तर आपण घाबरतो आणि जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळापळ करतो. असाच एक जीवघेनारा प्राणी आहे मगर. खरतर मगर हा प्राणी तसा शांत असतो आणि पाण्यामध्ये जास्त असतो पण जर तुम्ही जर चुकून त्याची खोड काढली तर मात्र तो जीवावर बेतणारा प्रकार होऊ शकतो.

त्यामुळे मनुष्य अश्या प्राण्यांपासून लांबच राहतो. पण तुम्ही कधी अश्या मगरी बद्दल ऐकले आहे का जी माणसाला कधीही धोका ठरली नाही आणि ज्यास एक संपूर्ण गाव प्रेम करत असेल आणि एवढेच नाही तर मगर मेल्यानंतर ढसाढसा रडले असतील.

कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण छत्तिसगढ मधील बेमतरा जिल्ह्यातील मोहतरा गावामध्ये असे झाले आहे. येथे एका मगरीच्या मृत्यूनंतर लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांच्या डोळ्यात देखील पाणी होते. काय होते पूर्ण प्रकरण चला पाहू.

देवा प्रमाणे पूजा करत होते लोक

खरतर गावातील तलावा मध्ये अनेक वर्षा पासून एक मगर राहत होती. ज्यास गावातील लोकांनी ‘गंगाराम’ असे नाव दिले होते. ही मगर कधी कोणालाही नुकसान करत नसे. गावातील लहानमुले कोणतीही भीती न बाळगता तलावा मध्ये अंघोळ करत असत खेळत असत पण मगरीने यांना कधी इजा केली नाही. त्यामुळे गावातील लोकांना मगर प्रिय होता आणि त्याचे नाव गंगाराम ठेवले होते. गावातील लोक गंगाराम ची पूजा देवा प्रमाणे करत होते. पण मंगळवारचा दिवस गावातील लोकांसाठी चांगला नव्हता. मंगळवारी गंगाराम मृत झाला आणि गावावर दुखाचे डोंगर कोसळले. गंगारामच्या मृत्यूने दुखी झालेल्या लोकांनी पोस्टमार्टम करणाऱ्या टीमला गावात बोलावले ज्या नंतर गांगारामचे पोस्टमार्टम केले गेले.

130 वर्षा पेक्षा जास्त झाले होते वय

गावातील लोकांना गांगारामच्या खऱ्या वया बद्दल माहिती नाही पण त्यांचे म्हणणे आहे कि त्याचे वय 130 पेक्षा जास्त होते. मोहतरा गाव एक धार्मिक-पौराणिक नगरी म्हणून जिल्हामध्ये प्रसिध्द आहे. असे बोललेले जाते कि अनेक वर्षा पूर्ण या गावामध्ये एक सिद्ध पुरुष महंत ईश्वरीशरण देव उत्तर प्रदेशातून आले होते आणि तेच आपल्या सोबत पाळीव मगर घेऊन आले होते. त्यांनी गावातील तलावामध्ये ती मगर सोडली. असे बोलले जाते कि गंगाराम सोबत अजूनही मगर होत्या पण शेवट पर्यंत गंगाराम वाचला. गावातील लोक सांगतात कि गंगाराम कधीकधी तलावाच्या बाहेर येऊन बसत असे. एवढेच नाही तर पावसाळ्यात तो गावातील गल्ल्यांमध्ये देखील फिरत असे आणि शेतात देखील जात असे. लोक न घाबरता आपले काम करत असत आणि त्याला आपल्या मुला सारखे सांभाळत होते. अनेक वेळा स्वता गावातील लोक गंगारामला पकडून तलावामध्ये सोडत असत.

Tags

Related Articles

Back to top button