Connect with us

या आहेत त्या स्त्रिया ज्या विवाहित असून सुध्दा आहेत पवित्र आणि कुमारिका, पहा याचे कारण

Viral

या आहेत त्या स्त्रिया ज्या विवाहित असून सुध्दा आहेत पवित्र आणि कुमारिका, पहा याचे कारण

स्त्रियांच्या पवित्रते बद्दल आपल्या समाजात जवळपास कोणीही प्रश्न करत असतो. एक स्त्री भलेही कितीही खरी आणि पवित्र असली तरी लोक तिच्यावर शक करतातच. एवढेच नाही तर प्रभू रामचंद्रांची पत्नी म्हणजे सीता मातेसही आपल्या पवित्र असण्याला सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती.

आज आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला त्या स्त्रियांच्या बद्दल माहीती देणार आहोत ज्यांना युगानुयुगे पवित्र मानले गेले आहे. पण यातील बहुतांश महिला विवाहित असून सुध्दा यांना पवित्र स्त्रीचा दर्जा दिला गेलेला आहे. आता कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की या स्त्रिया विवाहित असून या पवित्र आणि कुमारिका कश्या असू शकतात.

अहिल्या

अहिल्या गौतम ऋषि ची पत्नी होती आणि अत्यंत रूपवान होती. खरेतर भगवान इंद्राने गौतमचे रूप धारण करून अहिल्या सोबत काही वेळ व्यतीत केला होता ज्यानंतर ऋषी गौतम क्रोधीत झाले आणि त्यांनी क्रोधीत होऊन अहिल्यास दगड बनण्याचा श्राप दिला होता. पण खरे तर अहिल्या आपल्या पती सोबत अत्यंत प्रामाणिक होती. आपल्या पतिव्रता स्वभावामुळे अहिल्याने तो श्राप स्वीकार केला आणि दगड बनून जीवन जगणे सुरु केले. पण जेव्हा ऋषींचा राग थंड झाला तेव्हा त्यांनी अहिल्याला श्रापातून मुक्तीसाठी श्री रामाच्या चरणांना स्पर्श करण्यास सांगितले. जेव्हा अहिल्याने श्री रामाच्या चरणांना स्पर्श केला तेव्हा भगवान त्यांना पवित्र स्त्री म्हणाले आणि या पद्धतीने अहिल्या श्राप मुक्त झाली. तेव्हा पासूनच अहिल्यास कुमारी आणि पवित्र मानले जाते.

तारा

तारा सुग्रीवचा भाऊ बालीची पत्नी होती जीचा जन्म समुद्र मंथन करताना झाला होता. ताराचा विवाह भगवान विष्णूने स्वता बाली सोबत करवून दिला होता. एकदा बाली असुरांच्या सोबत लढाई करण्यास गेला आणि परतला नाही त्यामुळे सर्वांनी त्यास मृत समजले त्यानंतर संपूर्ण राज्य सुग्रीव सांभाळू लागला आणि सोबतच सुग्रीव ने तारा ला पण आपल्या अधीन घेतले. पण जेव्हा बाली परत आला तेव्हा त्याने सुग्रीव कडून राज्य परत घेतले आणि त्यास राज्याच्या बाहेर काढले.

जेव्हा सुग्रीवाने भगवान राम यांची शरण घेतली तेव्हा तारा ने बालीचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. पण बाली रागामध्ये तिलाच सोडून निघून गेला. ज्यानंतर भगवान रामाने बालीचा वध केला. तारा ला आजही सर्वात पवित्र स्त्री मानले जाते.

मंदोदरी

मंदोदरी अत्यंत सुदर आणि सुशील स्त्री होती. मंदोदरीचा विवाह राक्षस म्हणजेच रावण सोबत झाला होता. मंदोदरी नेहमी चांगले आणि वाईट यामधला फरक समजावत राहिली पण रावण कधीही तीचे ऐकत नसे. रावण वधा नंतर भगवान रामाने मंदोदरीला विभीषणच्या सहारे दिले. आपल्या शांत गुणांच्यामुळे आजही मंदोदरीला कुमारी मानले जाते.

द्रोपदी

महाभारतातील द्रोपदी पाच पांडवांची पत्नी होती. द्रोपदीच्या मजबूत व्यक्तिमत्वामुळे आजही तिला कुमारी कन्येच्या श्रेणीत ठेवले जाते. द्रोपदीने आपल्या संपूर्ण जीवनात पाच पांडवांना साथ दिली. याच सोबत तीने कधीही एकही पती सोबत एकटे राहण्याचा हट्ट केला नाही. द्रोपदीला पापांचा विनाश करणारी मानले जाते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top