health

वजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!

बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते. वजन वाढू लागते आणि पोटाजवळ चरबी जमू लागते. मग हळूहळू पोटाचा आकारही वाढू लागतो. ते दिसायला तर वाईट दिसतेच पण आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. मग आपण डायटिंग, वर्कआऊटकडे वळतो. पण एक फळ तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.

१. अधिक प्रमाणात साखर खावू नका. वजन कमी करण्यासाठी गोड खाणे कमी करा. याचा परिणाम तुम्हाला हळूहळू जाणवू लागेल.

२. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या. त्यामुळे शरीरातील विषद्रव्य कमी होण्यास मदत होईल. परिणामी वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

३. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॉमिन्स आणि मिनरल्स असतात. त्याचबरोबर या भाज्यांमध्ये पाण्याचा अंश असतो. त्यामुळे वजन लवकर कमी होते.

४. पोट आणि कंबरेजवळीची चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे पपईचे सेवन करा. रोज पपई खाल्याने काही दिवसातच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागेल.


Show More

Related Articles

Back to top button