health

नदीमध्ये सिक्के टाकण्यामागे आहे वैज्ञानिक कारण ही अंधश्रद्धा नाही, पहा आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर

भारतामधील जवळपास सर्व धर्मात दानधर्म करण्यास उच्च मानले गेले आहे. आपल्या शास्त्रा मध्ये असे लिहिले गेले आहे की जो व्यक्ती दान धर्म करतो त्यावर ईश्वर सदैव कृपा करतो. या परंपरे अंतर्गत अनेक परंपरा आहेत ज्यांचे आपण पालन करतो त्यामधीलच एक आहे नदी मध्ये सिक्के टाकणे. खरतर नदीमध्ये सिक्के टाकण्याचे काय आहे कारण आहे त्यामागचे महत्व काय आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चलातर पाहूया नदीमध्ये सिक्के टाकण्या मागे काय रहस्य लपलेले आहे.

याकारणा मुळे लोक नदी मध्ये सिक्के टाकतात

तुम्ही नेहमी पाहिले असेल की लोक नेहमी जेव्हा पण नदीवरून प्रवास करतात तेव्हा नदीमध्ये एक सिक्का (कॉईन) टाकतात. कधी कधी लोक ट्रेन आणि बस मधून प्रवास करताना देखील नदीवरून ट्रेन किंवा बस जात असेल तर सिक्के फेकतात.

या परंपरेच्या मागे कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. तर एक कारण आहे खरेतर लोक पहिले नदी मध्ये तांब्याचे सिक्के नदीमध्ये टाकतात असत ज्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होते. पूर्वीच्या काळी सिक्के तांब्याच्या धातूचे असायचे त्यामुळे नदीमध्ये तांब्याचे सिक्के टाकत असत.

तांब्याच्या भांडया मधील जल पिणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. या उद्देशाने देखील लोक नदीमध्ये तांब्याचे सिक्के टाकत असत. असे केल्यामुळे नदी स्वच्छ राहत असे आणि परिणामी लोकांचे आरोग्य देखील चांगले राहत असे. आजकाल तांब्याचे सिक्के चलनात नाही आहेत पण तरीही लोक ही परंपरा पाळत करत आहेत.

ज्योतिषशास्त्र च्या दृष्टीकोनातून देखील नदी मध्ये सिक्के टाकण्याची परंपरा आहे.

ज्योतिषशास्त्रा मध्ये देखील ग्रहदोष दूर करण्यासाठी नदीमध्ये सिक्के टाकण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की जर नदी मध्ये सिक्के आणि पुजेची सामग्री प्रवाहीत करण्यामुळे अनेक प्रकारचे ग्रह दोष दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुखसमृध्दी येते.

यासोबत अशीही मान्यता आहे की नदीमध्ये सिक्के टाकणे पुण्याचे काम आहे कारण नदी किनाऱ्यावर असलेल्या गावातील मुले नदीतील सिक्के एकत्र करून आपल्या गरजा पूर्ण करतात यासाठी यापद्धतीने दान केले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणाच्या कुंडली मध्ये चंद्र दोष असेल तर त्या व्यक्तीने वाहत्या नदी मध्ये चांदीचा सिक्का टाकला पाहिजे यामुळे चंद्र दोष दूर होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे कोणते आजार बरे करते आणि दूर ठेवते


Show More

Related Articles

Back to top button