Connect with us

100 मर्डर आणि 200 दरोडे करून संत झाला हा डाकू, इंदिरा गांधी ना दिली होती धमकी

People

100 मर्डर आणि 200 दरोडे करून संत झाला हा डाकू, इंदिरा गांधी ना दिली होती धमकी

चंबल की घाटी दरोडेखोरांसाठी प्रसिध्द आहे हे तुम्हाला माहीत असेलच किंवा बॉलीवूडच्या जुन्या सिनेमात याबद्दल ऐकले असेलच. याच चंबलच्या घाटी मध्ये 1970 च्या काळात पंचम सिंह कुख्यात डाकू होता. त्याच्यावर 100 मर्डर आणि 200 दरोडे टाकल्याचे गंभीर आरोप होते आणि सरकारने याला पकडण्यासाठी 2 करोडचे बक्षीस घोषित केले होते. तो मंगळवारी सिरोही येथे आला तेथे त्याने पत्रकारांच्या सोबत गप्पा मारल्या.

पंचम सिंहच्या जीवनातील महत्वाच्या घटना

पंचम सिंह यांनी 1972 मध्ये तत्कालीन प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहून सरकार बनविण्याचे आणि पाडण्याची धमकी दिली होती. या घटनेने रागवलेल्या इंदिराजींनी चंबल घाटी मध्ये सेनेचे हेलिकॉप्टर पाठवून डाकूंचा खात्मा करण्याची योजना केली होती पण पंचम सिंहच्या नेतृत्वात सगळे डाकू शेतकरी बनून आजूबाजूच्या गावात निघून गेले होते.

यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण व्यास यांना दूत बनवून डाकूनां समर्पण करण्यासाठी संदेश पाठवण्यात आला होता. यावर पंचम सिंहने 8 मागण्या पूर्ण केल्या तरच समर्पण करण्याचा भरोसा दिला. मागण्या मानण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पंचम सिंह मोड सिंह सह चंबलच्या घाटी मधील सर्व 556 डाकुंनी आत्म समर्पण केले होते.

पण सरकारने पंचम सिंह मोड सिंह वर केस चालवल्या, ज्यामध्ये त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण व्यास यांनी राष्ट्रपतिकडे त्यांची फाशीची सजा माफ करण्यासाठी शिफारस केली, जी राष्ट्रपति ने मंजूर केली. त्यामुळे पंचम सिंह यांना आजीवन कारावासची सजा झाली.

ब्रह्मकुमारीच्या साधक बहिणींनी बदलवले आचरण

पंचम सिंह सांगतात की खुल्या जेलमध्ये ब्रह्मकुमारीच्या महिला साधकांनी त्यांचे आचरण बदलवले. ज्यामुळे त्यांना 8 वर्षात चांगल्या आचरणामुळे जेल मधून सुटका मिळाली. तेव्हा पासून ते लोकांपर्यंत शांती आणि भाईचाराचा संदेश पोहचवत आहेत.

मथुरा मध्ये त्यांचा आश्रम आहे. 96 वर्षाचे पंचम सिंह यांनी आता पर्यंत 27 राज्यातील 500 जेल मध्ये, 1 लाख शाळांमध्ये आणि 2 लाख गावांमध्ये सहज राजयोगचा प्रचार-प्रसार केला आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top