‘नोट’ मोजतांना या चुकांना केल्याने क्रोधीत होते लक्ष्मी माता, याचा परिणाम आपल्या…

शास्त्रा मध्ये लक्ष्मी माता ही धनाची देवी मानली गेली आहे. असे मानले जाते कि ज्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा असते तेथे पैश्याची कमी कधीच होत नाही. भगवान विष्णू यांची पत्नी माता लक्ष्मी आहे. धन आणि वैभव मिळवण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. काही कारणामुळे जर माता लक्ष्मी रुष्ट झाली तर त्या घरावर दरिद्रता येते आणि धन मिळेनासे होते. मान्यतांच्या अनुसार माता लक्ष्मी क्रोधीत होण्या मागे नोट मोजताना केल्या जाणाऱ्या काही चुका देखील कारणीभूत होऊ शकतात.

हिंदू धर्मात माता लक्ष्मी धनाची देवी आहे अशी मान्यता आहे. मंग ते धन कोणत्याही रूपात असले तरी त्यामध्ये माता लक्ष्मी वास करते. बोललं जात कि माता लक्ष्मी पैश्यांच्या रख-रखाव ने देखील नाराज होते. जेव्हाही लोक नोट मोजतात तेव्हा काही चुका करतात. या कारणामुळे त्यांना धन हानी होण्याची शक्यता वाढते. चला जाणून घेऊ अश्या कोणत्या चुका नोट मोजताना करणे टाळले पाहिजे.

अनेक वेळा असे पाहिले गेलं आहे कि लोकांकडे पैसे भरपूर असतात पण गरज असेल तेव्हा पैसे त्यांच्याकडे टिकत नाही. याचा अर्थ काही दोष असतो. वास्तु मध्ये सांगितलं गेलं आहे कि नोट मोजतांना हाताला थुंकी लावली नाही पाहिजे. असे केल्याने धनाचा निरादर होतो. जर नोट एकमेकांना चिटकलेले असतील तर बोटाना पाण्याचे थेंब लावून आपण नोट मोजू शकता. जेव्हाही आपण नोट मोजतो तेव्हा आपल्या जवळ पाण्याने भरलेल एक भांड ठेवावं त्यामुळे आपण आपली बोटे ओली करून नोट मोजू शकतो.

बोललं जात कि खाण्या पिण्याच्या वस्तू पर्स मध्ये नोटांच्या सोबत ठेवू नयेत. एवढंच नाही तर बाकी असलेलं बील किंवा बील भरल्याची पावती देखील ठेवू नयेत. जर पैसे हातातून किंवा पर्स मधून खाली पडले तर त्यास कपाळी लावून माफी मागूनच पर्स मध्ये ठेवलं पाहिजे. असे मानलं जात कि आपण असे केलं नाही तर भविष्यात आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते.

रात्री झोपताना आपल्या उषा जवळ पैसे ठेवू नयेत असं मानलं जात. रात्री पैसे आपल्या घराच्या तिजोरी मध्ये किंवा कपाटा मध्ये ठेवले पाहिजेत. एवढंच नाही तर गोमती चक्र किंवा लक्ष्मीच्या कवडी सोबत पैसे ठेवले पाहिजेत.

रस्त्यात पडलेले नोट लोकांना मिळतात याचा अर्थ हा होतो कि आपल्या जीवनात ज्या परिस्थिती आहेत त्यास गंभीरतेने घेतलं पाहिजे. जे निर्णय आपण घ्याल ते पूर्ण आत्मविश्वासाने घ्यावेत. असे केल्याने आपल्या जीवनात जे यश पाहिजे ते मिळेल सोबतच नियंत्रण आणि विश्वास देखील आपल्यात राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.