घरामध्ये कोणते फोटो किंवा चित्र लावल्याने होते आर्थिक प्रगती, मिळते संतान सुख आणि कुटुंबाचे प्रेम, आरोग्य प्राप्ती

आपण आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी आणि आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वेगवेगळे फोटो घरामध्ये लावतो. हे फोटो किंवा चित्र वेगवेगळ्या पद्धतीचे जसे लहान मोठे आणि वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि यांचा सरळ परिणाम आपल्या मनावर पडत असतो. यांचा आपल्या मनावर चांगला आणि वाईट दोन्ही पद्धतीने परिणाम होतात. कधी कधी हे फोटो आपल्या भाग्याला देखील प्रभावित करतात. हिंसक प्राण्यांचे चित्र लावल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये क्रोध भावना वाढते. तसेच कौटुंबिक नात्यामध्ये देखील कटुता येते.

अशी चित्रे लावल्याने कुटुंबातील प्रेम वाढेल

आपल्या बेडरूम मध्ये आपल्या विवाहाच्या वेळीचे फोटो लावले पाहिजेत यामुळे आपले प्रेम नेहमी वाढत राहील. पती-पत्नीचे एकत्रित फोटो आवश्य लावले पाहिजेत.

आई-वडील किंवा भाऊ-बहिणीचे फोटो उत्तर दिशेला लावणे चांगले राहील. जर आपल्याला एखाद्या मृत व्यक्तीचा फोटो लावायचा असेल तर तो दक्षिण भिंतीवर लावावा.

घरातील हॉल मध्ये किंवा डाईनिंग एरिया मध्ये कुटुंबाचा एकत्रित फोटो लावणे फायदेशीर आहे. यामुळे नात्यामध्ये गोडवा अधिक जास्त वाढतो.

पूजा उपासना करण्यासाठी कसे चित्र पावले पाहिजे

घराच्या पूर्व दिशेला आपण ज्या देवी-देवतांची पूजा उपासना करतो किंवा ज्या गुरूंना आपण मानतो त्यांचे फोटो लावू शकता. हे फोटो जेवढे साफ आणि स्पष्ट असतील तेवढे उत्तम असते. हे फोटो पूजा स्थानी किंवा कार्यस्थळी लावल्याने मन शांत राहते आणि नकारात्मक विचार मनात येत नाहीत. हे फोटो एवढ्या उंचीवर असले पाहिजेत कि आपल्या डोळ्यांच्या नजरेत आले पाहिजेत.

एकत्र भरपूर चित्र, पूजेच्या ठिकाणी लावली नाही पाहिजेत यामुळे मनावर विपरीत प्रभाव होऊ शकतो. चित्राचे रंग किंवा आकृती खराब झाली तर त्या चित्रास बदलले पाहिजे.

भाग्य उजळण्यासाठी कोणते चित्र लावली पाहिजेत

घरामध्ये प्रेम वाढवण्यासाठी मुख्य दरवाजा जवळ किंवा हॉल मध्ये फुल किंवा पाण्याचे फोटो लावले पाहिजेत. आर्थिक प्रगतीसाठी पूजा स्थानी बसलेल्या लक्ष्मीचे चित्र लावले पाहिजे.

संतान प्राप्तीसाठी कमळाच्या फुलांचे चित्र किंवा गाईचे चित्र बेडरूम मध्ये लावले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी कामाच्या ठिकाणी उगवत्या सूर्याचे चित्र लावावे.

सगळ्या प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पूजास्थानी भगवान शंकराचा किंवा भगवान श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद देत असतानाचे चित्र लावले पाहिजे.

चित्र किंवा फोटो लावताना कोणत्या सावधानी बाळगल्या पाहिजेत

शक्यतो रंगीत आणि सुंदर चित्र लावली पाहिजे, जंगली जनावरे, काटे, आग यांचे चित्र लावू नये. फोटो किंवा चित्र नेहमी स्वच्छ ठेवावीत यावर धूळ बसू देऊ नये.

पूजास्थानी म्हणजेच देवघरामध्ये पती-पत्नी, आणि मुलांचे फोटो तसेच बेडरूम मध्ये देवी देवतांचे फोटो किंवा चित्र लावू नयेत. घरामध्ये भरपूर चित्र लावू नयेत यामुळे नात्यातील गुंता वाढतो.