health

तोंडाचा कैंसर होण्याच्या अगोदर शरीरा कडून मिळतात हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

असे अनके लहानमोठे आजार आहेत ज्यांचा सामना व्यक्तीला आयुष्यात करावा लागतो पण कैंसर एक असा आजार आहे ज्याला प्राणघातक असल्याचे मानले जाते. जर कोणालाही हा आजार झाला तर त्याच्या जीवाला धोका असतो. कैंसर सगळ्या आजारामध्ये सर्वात गंभीर आजार मानला जातो. कैंसर अनेक प्रकारचे असतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागावर होतात परंतु आज आपण तोंडाच्या कैंसर विषयी माहिती घेणार आहोत. जी माहिती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कैंसर एक अशी समस्या आहे जी कोणत्याही महिलेला किंवा पुरुषाला झाला तर त्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

कैंसरच्या आजारामध्ये रुग्णाला वेदनांचा देखील सामना करावा लागतो. सेल्सची अनकंट्रोलेबल ग्रोथ म्हणजे कैंसर असतो जो शरीराच्या टिशूजना नुकसान करतो. तोंडाचा कैंसर हा जखमेच्या रूपाने तोंडामध्ये होतो जी दीर्घकाळ राहते. तोंडाचा कैंसर जीभ, गाल आणि तोंडाच्या आत होऊ शकतो. जर वेळीच याची माहिती मिळाली नाही आणि लवकर उपचार केला नाही तर व्यक्तीसाठी हा जीवघेणा होऊ शकतो.

जसे तुम्हाला माहित आहे कि कोणताही आजार होण्याच्या अगोदर शरीर आपल्याला त्याबद्दल काही पूर्व सुचना किंवा संकेत देते जे आपल्या शरीरावर दिसून येतात. आज आम्ही या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला तोंडाचा कैंसर झाल्यावर कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात याबद्दल माहिती देत आहोत.

तोंडाचा कैंसर झाल्यावर मिळतात हे संकेत

जर ओठ, हिरड्या आणि तोंडाच्या आतील बाजूस गाठ दिसत असेल किंवा सफेद किंवा लाल रंगाचे दाग दिसत असतील तर हे तोंडाच्या कैंसरचे संकेत असू शकतात.

जर तुमच्या तोंडामध्ये आणि गळ्यात वेदनेची समस्या आहे किंवा ते सुन्न होत असतील तर हे तोंडाच्या कैंसर बद्दल संकेत मानले जातात. याच सोबत तोंडाची त्वचा अचानक गरम होणे देखील याबद्दल संकेत देतात.

जर तुमच्या कानामध्ये वेदना होतात किंवा आवाज बदल झाला तर हे कैंसरचे लक्षण मानले जाते.

जर एक आठवड्यापेक्षा जास्त तोंडाची जखम राहिली आणि त्यामधून रक्त येत असेलतर तोंडाच्या कैंसरचे संकेत आहेत. या स्थिती मध्ये त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय करावा.

जर तोंडामधून अचानक रक्त निघण्याची समस्या होत असेल तर तुम्हाला सावध झाले पाहिजे कारण हे तोंडाच्या कैंसरचे संकेत असू शकतात.

जर व्यक्ती वयस्कर असेल तर या स्थिती मध्ये त्याचे दात सैल होतात किंवा दात पडणे हि एक सामान्य समस्या असते पण जर व्यक्तीच्या कमी वयात दात पडणे किंवा तुटणे हि समस्या तोंडाच्या कैंसरचा संकेत असू शकतो यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि उपचार करावा.

महत्वाची सूचना

वरील संकेत मिळण्याचा अर्थ तोंडाचा कैंसर झालाच असे नाही. यामागे काही दुसरी कारणे देखील असू शकतात त्यामुळे त्वरित डॉक्टर सोबत संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा. तसेच आपल्या मित्र आणि नातेवाईकांना या जीवघेण्या आजारा बद्दल वेळीच माहिती व्हावी ज्यामुळे त्यावरील उपचार वेळीच सुरु करणे सोप्पे जावे यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेयर करावी.

आमच्या फेसबुक पेजवर अशीच उपयोगी माहिती आम्ही नेहमी शेयर करत असतो त्यामुळे जर तुम्ही अजूनही पेज लाईक केले नसेल तर त्वरित पेज लाईक करा आणि सी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे आमच्या पोस्टची माहिती सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल. आमच्या फेसबुक पेजची लिंक fb.com/marathigold अशी आहे.

Show More

Related Articles

Back to top button