health

करा हे छोटेसे काम, डोळे कधीच होणार नाही कमजोर

डोळ्यांची योग्य देखभाल करणे फार आवश्यक आहे जर डोळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर डोळ्यांचे आजार होऊ शकतात. कॉम्प्यूटर, मोबाईल, आईपौड, स्मार्टफोन यांच्या वाढत्या वापरामुळे दिवसेंदिवस डोळ्यावरील ताण वाढत चालला आहे. डोळ्यांच्या विकारा पासून वाचण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. चला पाहूया कशी करावी डोळ्यांची देखभाल.

Eye Care Tteatment for Sharp Eyes

  • दररोज दोन ते तीन तास कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्तीत कॉम्प्यूटर विजन सिंड्रोमचे लक्षण दिसून येतात. काही सावधगिरीचे उपाय करून कॉम्प्यूटर विजन सिंड्रोम पासून वाचता येते.
  • डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी कॉम्प्यूटर, आईपैड, स्मार्टफोन यांच्या कमी वापरा सोबतच आपल्या लाइफस्टाइल मध्ये बदल करणे आवश्यक आहे. तेव्हाच सीवीएस च्या लक्षणांना नियंत्रित केले जाऊ शकते.
  • ज्या रूम मध्ये कॉम्प्यूटर असेल त्या रूम मध्ये योग्य प्रकाश असणे गरजेचे आहे. जास्त प्रकाश सुध्दा नसला पाहिजे आणि प्रकाश व्यक्तीच्या मागून आला पाहिजे समोरून नाही.

  • जेव्हापण कॉम्प्यूटरवर काम कराल तेव्हा प्रत्येक 20 मिनिटांनी एकदा 20 सेकंदासाठी स्क्रीन वरून आपली नजर दुसरीकडे फिरवा. आणि 20 फुट लांबच्या कोणत्याही फिक्स पोइंट वर फोकस करा.
  • आइज मूवमेंट डोळ्यांच्या सुधारणेसाठी लाभदायक असते. ऑफिस आणि घरी मॉनिटर असे सेट करा की तुमची नजर मॉनिटरच्या टॉप लेवल वर असेल.
  • कॉम्प्युटर डिवाइसचे कंट्रास्ट आणि ब्राईटनेस लेवल सेट करा किंवा एन्टीग्लेयर कवर आणि कॉम्प्यूटर ग्लास फिट करा.
  • जेव्हापण एक तासा पेक्षा जास्त स्क्रीनच्या समोर बसले असाल तेव्हा ड्राई आइज होण्या पासून वाचण्यासाठी आपले डोळे हळूहळू उघडझाप करा. तसेच सीवीएस पासून वाचण्यासाठी छोटे ब्रेक आणि हेल्दी लाइफस्टाइल मेंटेन करा.
  • वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी जरूर करा.
  • दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यांना स्वच्छ थंड पाण्याने धुवावे.

डोळ्यांची समस्याचे लक्षणे

डोके आणि डोळ्यांना भारीपण वाटणे, अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यात खाज येणे, डोळे कोरडे पडणे, रंग स्पष्ट न दिसणे,

जर तुम्ही कॉम्प्यूटर वर काम करताना या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही स्वताला बऱ्याच प्रमाणात कॉम्प्यूटर विजन सिंड्रोम च्या समस्ये पासून वाचवू शकता.


Show More

Related Articles

Back to top button