Money
SBI बैंक अकाऊंट घरबसल्या कसे ओपन कराल? जाणून घ्या
सध्या भारतीय स्टेट बैंक दोन प्रकारचे खाते ऑनलाईन उघडण्याची सुविधा देत आहे. त्यापैकी एक आहे डिजिटल सेविंग्स अकाउंट आणि दुसरा इंस्टा सेविंग्स अकाउंट, यासाठी तुम्हाला बैंकेच्या ब्रांच मध्ये जाण्याची गरज नाही. एसबीआई डिजिटल सेविंग्स अकाउंट आणि एसबीआई इंस्टा सेविंग्स अकाउंट दोन्ही 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या भारतीय निवासी नागरिक ओपन करू शकतात. हे खाते ते स्वतः संचालित करू शकतात.
Table of Contents
डिजिटल आणि इंस्टा अकाउंट काय आहे?
एसबीआय अनेक प्रकारचे बैंक बचत खाते सादर करते. यापैकी एसबीआई डिजिटल सेविंग्स आणि एसबीआई इंस्टा सेविंग्स अकाउंट्स नियमित बचत खात्याच्या तुलनेत कमी सुविधांच्या सोबत आहे.
खाते कसे सुरु कराल?
दोन्ही खाते ऑनलाईन एसबीआय च्या YONO मोबाईल एप मधून आणि एसबीआय च्या वेबसाईट sbi.yono.sbi वर जाऊन उघडू शकता.
आवश्यक दस्तावेज
जर तुम्हाला त्वरित खाते उघडायचे असेल तर तुम्हाला आधार, पैन आणि मोबाईल नंबर याची आवश्यकता राहील.
सुविधा कोणत्या मिळणार?
31 मार्च 2019 पर्यंत तुम्ही झिरो बैलेंस ठेवला तरी दंड लागू होणार नाही परंतु त्यानंतर दंड लागू होऊ शकतो.
तुम्हाला बैंक डेबिट कार्ड सह एटीम कार्ड देईल.
तुमच्या पसंती अनुसार तुम्ही होम ब्रांच निवडू शकता.
एक ग्राहक केवळ एकच खाते उघडू शकतो.
केवाईसी करण्यासाठी बैंकेच्या शाखेत जावे लागेल.
