food

कच्चा कांदा खाण्याचे फायदे – कांद्याचे औषधी उपयोग – Onion Benefits in Marathi

कच्चा कांदा खाण्याचे फायदे – कांद्याचे औषधी उपयोग – Onion Benefits in Marathi हे तुम्हाला माहिती हवेच कारण नेहमी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कांद्याचे फायदे जर तुम्हाला माहित असतील तर याचा वापर तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जरूर करू शकता. आज आपण येथे कांद्याचे औषधी उपयोग पाहणार आहोत.

तुम्हाला माहित असेलच की कच्चा कांदा खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही कांद्यास सलाद मध्ये कच्चा वापरू शकता. काय तुम्ही कच्चा कांदा खात नाहीत? जर नाही तर आज पासूनच कच्चा कांदा खाणे सुरु करा. कारण कच्चा कांदा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर आणि इतर आवश्यक विटामिन्स असतात. जे शरीरास अनेक आजारा पासून दूर ठेवतात. कच्चा कांदा तुम्ही सेंडविच, सलाद आणि चाट इत्यादी मध्ये टाकून खाऊ शकता.

कांद्याचे औषधी उपयोग

पोटाची स्वच्छता : कच्च्या कांद्या मध्ये फाइबर जास्त असते. जे पोटा मध्ये चिटकलेले अन्न बाहेर काढते. कच्चा कांदा खाण्यामुळे पोटाची सफाई होते. यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्या लोकांनी कच्चा कांदा आवश्य खावा.

रक्त शुध्द करण्यासाठी : कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते जे आपल्या रक्तास शुध्द करण्याचे कार्य करते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे यामुळे फास्फोरिक एसिड आपल्या धमनी मध्ये प्रवेश करून अशुध्दता दूर करेल.

वाचा : झटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते

लघवीस जास्त येणे : 4 कांदे बारीक वाटून चटणी बनवा आणि त्यामध्ये तेवढेच गव्हाचे पीठ मिक्स करून हलवा बनवा. नंतर हलके गरम असताना पोटावर लेप लावून झोपून राहावे. यामुळे लघवीस जास्त येणे बंद होईल.

पुरुषांना तरुण बनवतो : कांद्याचा रस आणि मध सम प्रमाणात मिक्स करा. या मिश्रणाचे सेवन कमजोर पुरुषांना जवान करतो. एवढेच नाही तर खराब गळा आणि खोकल्यास दूर करू शकतो.

शरीरास शक्तिशाली बनवतो : कांदा, मध आणि खडीसाखर एकत्र मिक्स करून खाण्यामुळे पोटाशी संबंधित रोग बरे होतात आणि शरीर शक्तिशाली होते.

नशा उतरवण्यासाठी : जो व्यक्ती नसे मध्ये असतो त्यास दररोज एक कांद्याचा रस रोज पिण्यामुळे त्याची नशा उतरते.

सर्दी : 10-20 मिली कांद्याच्या रसा मध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते.

डोळ्यांची नजर : कांद्याचा रस मधा मध्ये मिक्स करून डोळ्यांना लावल्याने डोळ्यांची नजर तेज होते.

काळे दाग : चेहऱ्यावरील काळे दाग दूर करण्यासाठी त्यावर कांद्याचा रस लावल्याने काळेपणा दूर होतो आणि चेहऱ्याची चमक वाढते.

नाकातून रक्त येत असल्यास : नाका मधून रक्त येत असल्यास कांद्याचा रस नाकामध्ये टाकल्याने नाक आणि गळ्याचे संक्रमण ठीक होते आणि नाकातून रक्त येणे ठीक होते.

अनिद्रा (झोप कमी येणे) : कच्च्या लाल कांद्याचा रस 4 चमचे पिण्यामुळे झोप चांगली येते.

चमक भरल्यास : शरीरात चमक भरल्यास कांद्याच्या गरम रसाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी यामुळे आराम मिळतो.

त्वचेवरील मस : कांद्याचा रस लावल्याने नष्ट होते.

फेफरे किंवा फिट : रोज सकाळी जवळपास 72 मिली कांद्याचा रस थोडेसे पाणी मिक्स करून पिण्यामुळे फेफरे येणे बंद होते. असे कमीत कमी 40 दिवस करू शकता. फिट आल्यास रुग्णाला कांद्याचा रसाचा वास घेण्यास दिल्यास तो नॉर्मल होतो.

कानदुखी वर उपाय : कानदुखी, कानात आवाज येणे किंवा बहिरेपणा असल्यास कांद्याचा रस थोडेसे गरम करून 5-7 थेंब टाकल्यामुळे फायदा मिळतो.

टक्कल : टक्कल असलेल्या भागास कांद्याचा रस लावून मालिश केल्यास केस परत येतात आणि केस गळणे थांबतात.

हिचकी : कांदा कापून आणि धुवून मीठ टाकून रुग्णास खाण्यास दिल्याने हिचकी (उचकी) थांबते.

बद्धकोष्ठता : कच्चा कांदा दररोज जेवताना खाण्यामुळे बद्धकोष्ठता ठीक होते. किंवा कांद्याचा काढा दररोज 40 मिली दिवसातून 2-3 वेळा सेवन केल्याने फायदा होतो.

पोटातील कृमी (किडे) आणि अजीर्ण : 1 चमचा कांद्याच्या रसास प्रत्येक 2-2 तासानंतर रुग्णास पिण्यास देण्यामुळे पोटातील किडे मारतात आणि अजीर्ण ठीक होते.

एसिडीटी : 60 ग्राम सफेद कांद्याच्या तुकड्यांना 30 ग्राम दह्यात मिक्स करून रोज कमीतकमी 7 दिवस 3 वेळा खाण्यामुळे  एसिडीटी मध्ये लाभ होतो.

वाचा : अन्न सहज पचन होत नाही तर या वस्तूंचे करा सेवन,दुरुस्त होईल पचनक्रिया

टाचांना भेगा : कच्चा कांदा वाटून टाचेवर बांधल्याने टाचांच्या भेगा ठीक होतात.

रक्त मूळव्याध : 100 मिली कांदा रस आणि 50 ग्राम साखर मिक्स करून पिण्यामुळे रक्त मुळव्याध मध्ये आराम मिळतो.

हातापाय अखडणे : कांद्याच्या गरम रसाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी यामुळे आराम मिळतो.

तुम्हाला कच्चा कांदा खाण्याचे फायदे – कांद्याचे औषधी उपयोग – Onion Benefits in Marathi हा लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये आवश्य लिहा. तसेच कांद्याचे औषधी उपयोग आपल्या मित्रपरिवारास समजण्यासाठी आर्टिकल शेयर करा.


Show More

Related Articles

Back to top button