dharmik

वाईटातील वाईट काळ दूर होईल, फक्त मारुती समोर दिवा लावून करावा लागेल मंत्राचा जप

हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार पूजापाठ केल्याने फक्त देवी-देवतांचा आशीर्वादच मिळत नाहीतर मन शांती देखील मिळते. जेव्हाही तुमचे मन अशांत असेल तेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरा मध्ये जाऊन बसा यामुळे तुम्हाला लगेच मन शांती मिळेल. यामागे सर्वात मोठे कारण सकारात्मक उर्जा असते. होय, मंदिराच्या आजूबाजूला सकारात्मक उर्जा प्रवाहित असते ज्यामुळे व्यक्तीला मनशांती मिळते. मंदिरा मध्ये वाजणाऱ्या घंटी मुळे देखील सकारात्मक उर्जा संचारित होते.

चांगल्या कर्माने पुण्य प्राप्त होते

याच कारणामुळे हिंदू धर्मामध्ये मंदिरात घंटी लावलेली असते. जेव्हा ही कोणी घंटानाद करतो तेव्हा सकारात्मक उर्जा संचार होतो. हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार तुम्ही भलेही पूजा-पाठ कमी केली तरी चालेल पण चांगले कर्म जेवढे जास्त करणे शक्य आहेत तेवढे केली पाहिजेत. यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांची पूजा अर्चना केली जाते. पण काही देवी-देवता असे आहेत जे देशाच्या प्रत्येक भागात पूज्य आहेत आणि त्यांनी पूजा केली जाते. यामधीलच एक आहेत रामभक्त हनुमान.

हनुमानास प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र आणि स्तोत्र आहेत. परंतु येथे दिलेल्या मंत्राचा जर कोणी दररोज विधी-विधानाने जप केला तर हनुमान त्याच्यावर प्रसन्न होतील. प्रसन्न झाल्यावर हनुमानजी व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट, समस्या कायमचे दूर करतील आणि जीवनात आनंदी आनंद निर्माण करतील.

मंत्र

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

असा करा मंत्राचा जप

दररोज सकाळी उठून स्नान इत्यादी केल्यावर चांगले कपडे घालून एका लाल कपड्यावर हनुमानजींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्थापित करावे.

यानंतर हनुमानास अबीर, गुलाल इत्यादी लावावे आणि सोबत एक लाल फुल अर्पित करावे. यानंतर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा जो पूजा समाप्त होई पर्यंत जळत राहिला पाहिजे.

दिवा लावल्या नंतर मंत्र जप सुरु करावा आणि कमीतकमी 5 माळ जप करावा.

जर काही कारणामुळे दररोज जप करणे शक्य नसेल तर मंगळवारच्या दिवशी जरूर या मंत्राचा जप करावा.

 


Tags
Show More

Related Articles

Back to top button