foodhealth

जायफळ कंबरदुखी, पोटदुखी, जीव घाबरणे, त्वचेची काळजी आणि बरेच फायदे देतो, तुम्हीच पहा

जायफळ आपण स्वयपाकघरा मध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरतो. परंतु याचे काही आयुर्वेदिक उपाय देखील आहेत. आज या आर्टिकल मध्ये आपण जायफळ आपल्याला कोणत्या आजारामध्ये फायदेशीर ठरतो ते पाहू.

जायफळचे झाड मोठे असते. याच्या जवळपास 80 जाती मानल्या गेल्या आहेत. भारत आणि मालद्वीप मध्ये एकूण 30 जाती आहेत.

जायफळ चे फायदे

सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा जायफळ चाटावे यामुळे गैस्ट्रिक, सर्दी-खोकला याची समस्या त्रास देत नाही. पोटदुखीचा त्रास झाल्यास चार ते पाच थेंब जायफळचे तेल साखरे सोबत घेतल्याने आराम मिळतो.

जोरदार डोकेदुखी होत असल्यास जायफळ पाण्यामध्ये घासून डोक्याला लावावे.

तुम्हाला काही कारणामुळे भूक लागत नसेल तर चिमुटभर जायफळ चाटावे यामुळे पाचक रसामध्ये वाढ होते आणि भूक वाढते. जेवण व्यवस्थित पचन होईल.

जुलाब किंवा पोटदुखी होत असल्यास जायफळ भाजून घ्यावे आणि त्याचे चार हिस्से करा एक हिस्सा रुग्णाला चघळण्यासाठी द्यावा. सकाळ संध्याकाळ एक-एक हिस्सा द्यावा.

प्रसुतीनंतर कंबरदुखी कमी होत नसल्यास जायफळ पाण्यामध्ये घासून कंबरेवर सकाळ संध्याकाळ लावावे. एका आठवड्यात वेदना दूर होतील.

टाचांना भेगा पडलेल्या असतील तर याची पेस्ट बनवून भेगांमध्ये भरावे. 12-15 दिवसात परिणाम दिसून येईल.

जायफळचे चूर्ण मधासोबत खाण्यामुळे हृद्य मजबूत होते. पोट देखील चांगले राहते.

जीव घाबरत असल्यास जायफळ थोडेसे घासून पाण्यामध्ये मिक्स करून पिण्यामुळे आराम मिळतो.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर जायफळ पेस्ट बनवून लेप लावावा. एका महिन्यात फरक दिसून येईल.

डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ दिसत असतील तर झोपण्याच्या वेळी रोज जायफळ लेप लावा आणि सुकल्यावर धुवावे. काही दिवसात काळे वर्तुळ निघून जातील.

दातदुखी होत असल्यास जायफळचे तेल कापसामध्ये लावून दुखणाऱ्या दाता खाली ठेवावा यामुळे वेदना बंद होईल. तसेच जर दाताला कीड लागली असेल तर ती मरून जाईल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : या पानाच्या रोजच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे, नाही घ्यावे लागणार कधीही औषधया पानाच्या रोजच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे, नाही घ्यावे लागणार कधीही औषध


Show More

Related Articles

Back to top button