food

गॅस सिलेंडर वर लिहिलेला हा नंबर का आहे महत्वाचा, काय आहे याचा अर्थ, 98% लोकांना माहीत नाही हे

स्वयपाक घरातील गॅस आपल्याला जेवढ्या सुविधा देतो तेवढाच तो धोकादायक पण आहे. आपल्याला टिव्ही आणि वर्तमानपत्रात गॅस सिलेंडर दुर्घटनेच्या बातम्या समजत असतात. त्यामुळे गॅस वापरताना आपल्याला आवश्यक सावधानी घ्यायला पाहिजे जर सिलेंडर लिकेजचा जरा पण संशय असेल तर त्याकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे.

तसेच सिलेंडर बद्दल अश्या काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे. आज आम्ही गॅस सिलेंडर बद्दल अशीच एक महत्वाची गोष्ट सांगत आहोत ज्याकडे तुम्ही नेहमी लक्ष ठेवले पाहिजे ज्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता कमी होऊ शकेल.

गॅस सिलेंडर बद्दल अत्यंत महत्वाची माहीती

काही वेळा आपण वस्तू वरील लिहिलेल्या अनेक कोड आणि मजकूरा कडे दुर्लक्ष करतो. असाच एक कोड गॅस सिलेंडर वर असतो आणि त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहीती देत आहोत. हा कोड सिलेंडरवर आपण रेग्युलेटर लावतो त्याचा जवळील 3 लोखंडी पट्ट्या पैकी एका पट्टीवर लिहिलेला असतो जसे खालील चित्रात दाखवले आहे त्या पद्धती मध्ये.

अनेक वेळा तुमचे लक्ष या नंबरकडे जात असेल पण कधी तुम्ही या नंबर बद्दल माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला नसेल. बहुतेक लोकांना या नंबरचा खरा अर्थ माहीत नसतो. हा नंबर गॅस सिलेंडर वापरणाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. चला आम्ही तुम्हाला याचा खरा अर्थ सांगतो.

खरतर हा नंबर गैस सिलेंडरचा एक्सपायरी डेट असते आणि एक्सपायरी डेट झाल्या नंतर सिलेंडर कधीही फुटू शकतो. या एक्सपायरी डेटची सुरुवात A, B, C, D पासून होते. याचा अर्थ हा आहेकी गॅस कंपनी प्रत्येक 3 महिन्यांना एका अक्षरा मध्ये दर्शवते. A चा अर्थ जानेवारी ते मार्च, B चा अर्थ एप्रिल ते जून, C चा अर्थ जुलै ते सप्टेंबर आणि D चा अर्थ ओक्टोंबर ते डिसेंबर असा असतो. याच सोबत दोन अंकी संख्या लिहलेली असते ती वर्ष सांगते. उदाहरणार्थ A-17 चा अर्थ असा होतो की गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट जानेवारी ते मार्च 2017 आहे. यानंतर या सिलेंडरला वापरने धोकादायक होऊ शकते आणि यामध्ये सिलेंडर लिकेज पासून ते सिलेंडर फुटणे हे सर्व धोके शामिल आहेत. त्यामुळे जेव्हापण नवीन गॅस सिलेंडर घ्याल तेव्हा हा नंबर जरूर चेक करा.

गॅस कंपन्या हा नंबर सिलेंडरवर लिहून त्यांची जिम्मेदारी निभावतात. त्या प्रमाणे आपण ही एक ग्राहक या नात्याने एक्सपायरी डेट कडे लक्ष ठेवून सिलेंडर घेतला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची माहीती 98% लोकांना माहीतच नाही तेव्हा गॅस सिलेंडर बाबतची ही अत्यंत महत्वाची माहीती सर्वांना समजण्यासाठी हा लेख सर्वांच्या सोबत शेअर करा. ज्यामुळे आपले नातेवाईक आणि मित्र परिवाराला सुध्दा ही माहीती समजेल.


Show More

Related Articles

Back to top button