Breaking News

नास्त्रेदमस भविष्यवाणी: या 4 गोष्टींनी जगाला आहे धोका, काय कोरोना वायरस बद्दल देखील केली होती भविष्यवाणी?

नास्त्रेदमस भविष्यवाणी : ज्योतिषानुसार भविष्यातील घटनांचा वर्तमानात शोध लावला जाऊ शकतो. ग्रहांची स्थिती बघून ही माहिती मिळवली जाते. पण एक असा भविष्यवक्ता होता ज्याने बर्‍याच शतका आधी येणाऱ्या अनेक वर्षा बद्दल भविष्यवाणी केली होती. वेळोवेळी मोठ्या घटनांना माइकल दि नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्यांशी जोडले गेले आहे. यांच्या अशा 4 भविष्यवाण्या आहेत ज्यामध्ये जगाची निम्मी लोकसंख्या नष्ट होण्याचा अंदाज आहे.

सर्वात पहिले जाणून घेऊ कोण होते नास्त्रेदमस : माइकल दि नास्त्रेदमसचा जन्म फ्रान्समधील ज्यू कुटुंबात 1503 मध्ये झाला. नंतर त्याने कॅथलिक धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या लिहिलेल्या ‘द प्रॉफेसीज’ पुस्तकामध्ये जगाविषयी अनेक भविष्यवाणी केलेल्या आहेत. त्या नेहमी चर्चेचा विषय राहिल्या आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की त्याच्या लिखित कवितांमध्ये जगातील सर्व प्रमुख घटनांची भविष्यवाणी दडलेली आहे. वेळोवेळी लोकांनी नेपोलियन आणि फ्रान्सच्या क्रांतीपासून केनेडीची हत्या आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याशी संबंधित घटनेशी संबंध जोडले आहेत. नास्त्रेदमस ने जगाबद्दल 4 मोठ्या भविष्यवाण्या कोणत्या आहेत जाणून घेऊ…

तिसरे महायु’द्ध : नास्त्रेदमस यांनी आपल्या भविष्यवाणी पुस्तकात लिहिले आहे – ‘पाणबुडीमध्ये सर्व शस्त्रे आणि कागदपत्रे घेऊन एक व्यक्ती इटलीच्या किनाऱ्यावर पोहचेल आणि यु’द्ध सुरू करेल. जेव्हा तिसरे यु’द्ध चालू असेल, त्यादरम्यान चीनच्या रासायनिक ह’ल्ल्या’मुळे आशियामध्ये विना’श आणि मृ’त्यू दिसून येईल, जो आजपर्यंत कधीही झाला नव्हता. – (सेंचुरीज vi-51)

हवामान बदल : नास्त्रेदमसच्या म्हणण्यानुसार हवामानात बरेच बदल होतील. नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होईल. पूर, वादळ, उष्णता आणि भूकंप वाढू लागतील. उष्णता शिगेला पोहोचेल. जमिनीतील पाणी कोरडे होण्यास सुरवात होईल, परंतु समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. त्यांच्या या भविष्यवाणीला आजच्या काळाशी जोडले जात आहे ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वार्मिंगचा परिणाम ज्या प्रकारे सुरू झाला आहे. हवामानातही मोठे बदल घडले आहेत, आता हळूहळू हवामान आणखी पुढे सरकत आहे. उन्हाळ्यात कडक उन्हाळा आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी, आणि पावसाळ्यात चारही बाजूला पूर पाहण्यास मिळत आहे.

साथीचा रोग (महामारी) : नास्त्रेदमसने देखील आपल्या पुस्तकात असा अंदाज केला होता की साथीचे रोग जगासाठी मोठा धोका ठरतील. एड्सच्या आधी जगात प्लेग एक साथीचा रोग होता, जो अनेक लोकांच्या मृ’त्यूचे कारण ठरला होता. मग कॉलरामुळेही लोकांना त्रास झाला. यानंतर इबोला, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूमुळेही अनेकांचे मृत्यू झाले. आता कोरोना विषाणूमुळे लोक आपला जीव गमावत आहेत. (सेंचुरीज vi-10) त्यांची कोरोना विषाणूबद्दलची भविष्यवाणी इंटरनेटवर व्हायरल होत आहे. काहीजण असा दावा करतात की नास्त्रेदमस त्याच्या भविष्यवाणीच्या पुस्तकाच्या 2:53 वचनात कोराना विषाणूचा उल्लेख केला आहे.

उल्का (एस्टेरॉयड) पासून हाहाकार : नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्यांनुसार, जेव्हा जगात तिसरे महायु’द्ध चालू असेल, तेव्हा आकाशातून पृथ्वीकडे एक फायर बॉल येईल, ज्यामुळे हिंद महासागरात वादळ निर्माण होईल. जगातील अनेक राष्ट्रे या घटनेने जलमग्न होतील. आकाशात दोन अशा उल्का आहेत ज्या पृथ्वीच्या दिशेने येत आहेत 2005 वाई-यू  55 आणि एपोफिस. एपोफिस ताशी 37014.91 किमी वेगाने पृथ्वीवर धडक देऊ शकते. (सेंचुरीज I-69)

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.