लागोपाठ दुसऱ्या महिन्यात देखील इतक्या रुपयांनी स्वस्त झाला घरगुती गैस सिलेंडर, जाणून घ्या किती रुपयांची होणार बचत

सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती गैस सिलेंडरच्या किमती मध्ये मोठी कमी करण्यात आलेली आहे. एक ऑगस्ट पासून ग्राहकांना या कमी दराचा फायदा मिळणार आहे. बिना सबसिडीवाल्या घरगुती गैस सिलेंडरच्या किमती मध्ये कमी करण्यात आलेली आहे आणि ती एक ऑगस्ट पासून लागू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारा मध्ये किंमत कमी झाल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने सांगितले कि बिना सबसिडी किंवा बाजारभावात मिळणाऱ्या एलपीजी च्या किमती 574.50 रुपये प्रति सिलेंडर होईल. नवीन दर 1 ऑगस्ट पासून लागू होतील. या अगोदर एक जुलै पासून बिना सबसिडी वाल्या एलपीजी सिलेंडर किमती मध्ये 100.50 रुपये प्रति सिलेंडर कमी करण्यात आली होती. या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट मध्ये 62.50 रुपयांनी एलपीजी स्वस्त झालेला आहे.

याचा अर्थ मागील दोन महिन्यात मिळून बिना सबसिडीवाला सिलेंडर 163 रुपयांनी स्वस्त झाला आहे. बिना सबसिडी घरगुती गैस सिलेंडरचा दर कमी झाल्याने त्याचा परिणाम गैस सिलेंडर घेताना द्यावे लागणाऱ्या किमती वर पडणार आहे. एलपीजी सिलेंडरच्या 14.2 किलो च्या सिलेंडरला 1 ऑगस्ट पासून 574.50 रुपये द्यावे लागणार आहेत. तर जुलै मध्ये 637 रुपये द्यावे लागत होते. या किमती मध्ये प्रदेशानुसार फरक असू शकतो.

आपल्या माहितीसाठी दर महिन्याला इंधन कंपन्या LPG सिलेंडर किमतीची समीक्षा करतात. त्यानुसार दर महिन्याला किमती मध्ये बदल होत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here