Connect with us

केवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?

Food

केवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?

अनेक वेळा असे घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी राहता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर असे अजिबात करु नका.

कधीकधी वजन कमी करण्यासाठीदेखील तुम्ही फक्त रात्री एकदाच जेवण घेण्याचा विचार करता, कदाचित तुम्हाला असे वाटत असते की हा कॅलरीज कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे.मात्र लक्षात ठेवा दिवसभर उपाशी राहून फक्त संध्याकाळी अथवा रात्री जेवणे योग्य नाही.

कलकत्तामधील आनंदापूर येथील फोर्टीस हॉस्पिटलच्या चिफ न्यूट्रीशनिस्ट मीता शुक्ला यांच्याकडून जाणून घेऊयात दिवसभर उपाशी राहून रात्री भरपूर खाणे योग्य आहे का?

कधीकधी असे करणे ठीक आहे पण तुम्ही जर असे नियमित करत असाल तर ते नक्कीच अयोग्य आहे. कारण निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने संतुलित आहार घेणे आवश्यक असते तसेच दिवसभर काहीही न खाता जर तुम्ही रात्री जड जेवण केले तर ते हितकारक नाही.कारण त्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करणे देखील कठीण जाते.यासाठी जरी तुम्ही दिवसभर काही खाल्ले नसेल अथवा दिवसभर फक्त सलाडसारखे हलके पदार्थ खाल्ले असले तरी देखील रात्री हलकाच आहार घ्या.

वजन कमी करताना शरीराच्या पोषणाच्या दृष्टीने उपाशी राहणे अयोग्य आहे.पण कधीकधी लंघन अथवा उपवास केल्यामुळे तुमचे शरीर डीटॉक्स होण्यास देखील मदत होते.उपाशी राहल्यामुळे शरीरातील कॅलरीज मध्ये साठवलेला ग्लायकोजीन हा घटक कमी होतो.पण त्यामुळे लगेच तुमचे वजन कमी होते असे नाही.जाणून घ्या
जेवणानंतर गोड खाणे ही आरोग्यदायी सवय आहे का ?

दिवसभर उपाशी राहल्याने तुमचे मेटाबॉलीझम खालावते.तुम्हाला चांगली झोप लागत नाही व तुमच्या शरीरातील स्नायूंमधील टीश्यूज देखील बर्न होतात.तसेच दिवसभर उपाशी राहून जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा त्या अन्नाचे त्वरीत चरबीत रुपांतर होते ज्यामुळे तुमचे वजन अधिक वाढू शकते.जर तुम्हाला रात्री एखाद्या लग्नाला अथवा पार्टीला जायचे असेल तर त्या ठिकाणी कॅलरीयुक्त पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळण्यासाठी जाण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा म्हणजे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top