Breaking News

या कलाकाराची बायको कोणत्याही हॉलिवूड स्टार पेक्षा कमी नाही

आता पर्यंत तुम्ही सोशल मीडियावर आणि विशेषतः मिम्स द्वारे फेमस असलेल्या Paw Paw म्हणजेच Osita Iheme बद्दल जाणून घेणार आहोत. याला कलाकाराचे नाव तुम्हाला माहीत नसेल परंतु मिम्स मधून तुम्ही याला नक्कीच पाहिलं असेल या बद्दल आम्हाला खात्री आहे.

आपल्या माहितीसाठी या कलाकाराचे नाव आहे Osita Iheme याला Paw Paw म्हणून देखील ओळखतात. कदाचित तुम्हाला हा एक लहान मुलगा वाटत असेल पण याच खरं वय 39 वर्ष आहे. काय वाचून धक्का बसलाना पण मित्रांनो हे खरं आहे त्याच वय 39 आहे. हाइट कमी असल्यामुळे तो आपल्याला लहान मुलगा वाटतो परंतु तो लहान बिलकुल नाही.

Osita ihema हा एक Nigerian Actor आहे. याचा जन्म 20 फेब्रुवारी 1982 रोजी Mbatoli Nigeria मध्ये झाला. याचा जन्म येथील एका गरीब कुटुंबात झाला होता.

Osita ihema ने आपले लहानपणी चे शिक्षण IMO State Nigeria येथून केलं. त्यानंतर पुढील शिक्षण B.Sc Computer Science केलं. त्याला लहानपणा पासून फुटबॉल प्लेयर बनायचं होत. पण पुढे जाऊन त्यांचे स्वप्न एक्टिंग झाले आणि पुढे यामध्येच त्याने आपलं भविष्य घडवलं.

Osita iheme ने करियर ची सुरुवात एक्टिंगसाठी ऑडिशन देऊन केली ज्यानंतर त्याला 2003 मध्ये एका मुव्ही मध्ये काम करण्याची संधी भेटली ज्याचे नाव AKI NA UKWA  असं होत.

आपल्या माहितीसाठी या फिल्म मध्ये त्याने एका लहान मुलाचा रोल केला होता ज्याचं नाव पाव पाव होत. आणि या फिल्म नंतर तो लोकांमध्ये खूप फेमस झाला होता.

Osita iheme 2002-03 पासून फिल्म मध्ये काम करत आहे. आपण जे व्हिडीओ पाहतो ते खरंतर 17 वर्षा पूर्वीचे व्हिडीओज आहेत.

Osita Iheme चे लग्न झालेल आहे त्याच्या पत्नीच नाव रोमा आहे आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे. ओसीटा पत्नी सोबत खालील फोटो मध्ये पाहू शकता.

Osita iheme च्या प्रसिद्धच श्रेय जात निकोल नावाच्या एका मुलीला निकोल ब्राजील मध्ये राहते. निकोल ने Osita ची एक फिल्म पाहिली आणि तिला फिल्म एवढी आवडली की तिने ट्विटर वर Nohllywood Troll नावाने एक पेज बनवलं आणि त्यामध्ये ओसीटा च्या मुव्हीजच्या क्लिप्स शेअर करू लागली. हळूहळू या पोस्ट वर व्ह्यूज वाढत गेले आणि ओसीटा सोशल मीडियावर वायरल झाला आणि संपूर्ण जगात त्याला ओळख मिळाली.

आपल्याला वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा आणि आम्हाला प्रतिक्रिया कमेंट करा.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.