Tejas Fighter Jet Crashes: दुबईमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये गुरुवारी भारतीय वायुसेनेचे तेजस लढाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. एअर शोदरम्यान हवाई कसरती करताना हा अपघात झाला.
घटना कशी घडली?
प्रदर्शनादरम्यान तेजस विमान आपल्या नियमित उड्डाण कसरती करत असताना अचानक नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यानंतर विमान कोसळले.
वैमानिकाची स्थिती अद्याप अस्पष्ट
या दुर्घटनेत वैमानिक सुरक्षित आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. विमानाचे नुकसान किती झाले आहे, याचाही तपशील मिळालेला नाही.
अधिक माहितीची प्रतीक्षा
ही एक ब्रेकिंग न्यूज असल्याने अधिकृत माहिती अद्याप येत आहे. अधिक अपडेट्स मिळताच बातमी अद्ययावत करण्यात येईल. कृपया ताज्या घडामोडीसाठी पृष्ठ रीफ्रेश करा.

