सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान घटस्फोट घेत आहे. दोघांनी घटस्फोटासाठी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. शुक्रवारी सोहेल आणि सीमा कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसले. दोघेही कोर्टातून वेगळे निघून गेले होते. दोघांनीही लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
सोहेल घटस्फोट घेत आहे
सूत्रानुसार, शुक्रवारी सोहेल खान आणि सीमा सचदेव कौटुंबिक न्यायालयात हजर झाले. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पण दोघांमधील मैत्री अजूनही कायम आहे. दोघांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत कोणालाच सांगण्यात आले नाही. दोघांनीही आपला निर्णय खाजगी ठेवणे योग्य समजले आणि नंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते वेगळे राहत होते.


या जोडप्याच्या जवळच्या मित्राने सांगितले की, सीमा आणि सोहेलमध्ये कोणताही वाद नाही. दोघांनी मिळून हा निर्णय घेतला असून आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल आणि सीमा यांच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
कोण आहे सीमा खान?
सीमा खानचे खरे नाव सीमा सचदेव आहे. ती व्यवसायाने फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. सीमाने स्वत:चे Kallista नावाचे सलूनही उघडल्याचे वृत्त आहे. सुझैन खान आणि महीप कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील वांद्रे येथे 190 लक्झरी बुटीक उघडले होते.
वेब सिरीज मध्ये झालेला खुलासा
तिने 1998 मध्ये सोहेल खानसोबत लग्न केले. दोघांना दोन पुत्र असून त्यांची नावे योहान आणि निर्वाण आहेत. आता लग्नाच्या 24 वर्षानंतर दोघेही वेगळे होत आहेत. 2017 मध्येही सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. इतकेच नाही तर सोहेल आणि सीमा नेटफ्लिक्स शो ‘द फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’मध्ये वेगळे राहताना दिसले होते. या शोनंतर हे दोघे आता एकत्र नसल्याची अफवा क्लियर झाली होती.
View this post on Instagram
शोमध्ये सोहेलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सीमा म्हणाली होती की, कधी कधी तुम्ही मोठे होतात तेव्हा तुमचे नाते वेगळ्या दिशेने जाऊ लागते. मी दुःखी नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि आमची मुले आनंदी आहेत. सोहेल आणि माझा विवाह कन्वेंशनल नाही तर आम्ही एक कुटुंब आहोत. आमची मुलं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत.
सलमान खानच्या कुटुंबा मधला हा दुसरा घटस्फोट आहे. यापूर्वी अरबाज खान आणि मलायका अरोरा वेगळे झाले आहेत.