Breaking News
Home / न्यूज़ / प्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात

प्रोफेसर पदाची नोकरी सोडून सुरु केली बादली मध्ये मोत्यांची शेती, देश-विदेश मध्ये सप्लाय करून लाखो कमवतात

माणसाला त्याच्या जीवना मध्ये कधी आणि कोणती गोष्ट त्याला काही वेगळे करण्यासाठी प्रेरित करेल हे सांगता येणार नाही. आज आपण ज्या व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत त्यांची गोष्ट देखील अशीच आहे.

या महाशयांनी चांगली प्रोफेसरची नोकरी सोडली आणि मोती (Pearl Farming) सुरु केली आणि पहिल्याच वर्षात 3 लाख पेक्षा जास्त रुपयांची कमाई केली.

आपल्या मना मध्ये असा समज आहे कि मोती हे फक्त समुद्रा मध्येच होतात. परंतु आपला हा समज चुकीचा ठरावाला आहे केरल मधील कासरगोड या परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय के जे माथचंद (KJ Mathchand) यांनी हे जवळपास दोन दशक आपल्या घरामध्ये बनलेल्या तलावा मध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 50 बादली पेक्षा जास्त मोतीचे उत्पादन करतात.

यांचे मोती सौदी अरब, ऑस्ट्रेलिया, कुवैत आणि स्विटीजरलैंड मध्ये निर्यात होतात आणि यांची कमाई लाखो मध्ये होते. यांचे मोती परदेशात निर्यात झाल्यामुळे यांना कमाई चांगली होते.

प्रोफेसर ते शेतकरी बनण्याची प्रवास आणि प्रेरणा

के जे माथचंद (KJ Mathchand) हे सौदी अरब मधील ‘किंग फहद युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड मिनरल्स’ मध्ये दूरसंचार डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसरची नोकरी करत होते. एकदा त्यांना अरामको ऑईल कंपनी कडून इंग्लिश ट्रान्स्लेटर म्हणून चीन मध्ये पाठवण्यात आले.

मत्सपालन मध्ये रुची असल्यामुळे ते चीन प्रवासा दरम्यान वुशी मधील ‘दंशुई मत्स्य अनुसंधान केंद्र’ येथे गेले. तेथे यांना समजलं कि येथे मोती उत्पादन संबंधित डिप्लोमा कोर्स चालवला जातो. त्यांना हे काही नवीन वाटले त्यामुळे त्यांनी या डिप्लोमा करण्यासाठी एडमिशन घेण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी आपली प्रोफेसरची नोकरी सोडली आणि 6 महिने कोर्स करण्यासाठी चीन मध्ये गेले.

डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वदेशी येऊन मोती ची शेती करण्याचे मनावर घेतले आणि वर्ष 1999 मध्ये 1.5 लाख भांडवल गुंतवणूक करून आपल्या तलावा मध्ये मोती ची शेती सुरु केली आणि त्यावर्षी त्यांना 4.5 लाख रुपयांचे मोती विक्री केली. अश्या प्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच 3 लाख रुपये फायदा झाला.

माथचंद म्हणतात कि “हा माझा घाईगडबडीत घेतलेला निर्णय होता ज्या बद्दल अनेक लोकांनी विरोध दर्शवला, पण मला माझ्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता कि हा एक जबरदस्त व्यवसाय ठरणार आहे आणि मी विरोधकांवर लक्ष न देता मला जे करायचं होत त्याकडे लक्ष दिले.”

मोती ची शेती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम घाटातून निघणाऱ्या नदी मधून शिंपले आणले आणि त्यांना बादली मध्ये प्रक्रिया केली. पहिल्या 18 महिन्यात शेती मधून त्यांना 50 बादल्या मोतींचे उत्पन्न झाले ज्यानंतर त्यांचा व्यवसाय सतत प्रगती करू लागला.

माथचंद यांची मोती ची शेती करण्याची पद्धत

माथचंद यांच्या अनुसार मोती मुख्यतः तीन प्रकारचे असतात कृत्रिम, नैसर्गिक आणि संवर्धित. माथचंद मागील 21 वर्षा पासून संवर्धित मोतीची शेती करत आहेत. त्यांच्या अनुसार भारता मध्ये ही शेती करणे सोप्पे आहे कारण त्यासाठी उपयुक्त ताजे पाणी येथे सहज उपलब्ध आहे.

माथचंद नदी मधून आणलेले शिंपले सावधान पूर्वक उघडतात आणि मंग त्यांना जीवाणु युक्त कंटेनर मध्ये 15 ते 25 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम पाण्यामध्ये पूर्णतः बुडवतात. ज्यानंतर प्रक्रिया होऊन मोती बनण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी लागतो.

या मोत्यांची किंमत 360 रुपये प्रति कैरेट म्हणजेच 1800 रुपये प्रति ग्राम असते. आपल्या उच्च प्रतीच्या गुणवत्ते मुळे हे मोती देशा सोबतच विदेशात देखील प्रचलित आहेत ज्यामुळे माथचंद यांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे.

त्यामुळे केरल आणि कर्नाटक विश्वविद्यालय चे अनेक विद्यार्थी मोतीची शेती पाहण्यासाठी येतात आणि माथचंद अनेक विश्वविद्यालयात या संबंधित लेक्चर देण्यासाठी जात असतात. एवढेच नाही त्यांची शेती पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात आणि त्यांच्या पद्धतीची स्तुती करतात. इच्छुक लोकांना माथचंद यांनी ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग देखील दिलेली आहे.

माथचंद यांनी नोकरी सोडून एक धाडशी निर्णय घेतला आणि त्यामध्ये यश मिळवले नाही तर ते देखील आज इतर सामान्य व्यक्ती प्रमाणे गर्दीचा भाग राहिले असते. त्यांच्या धाडसा ने त्यांना देश विदेशा मध्ये प्रसिद्धी मिळवून दिली.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.