Mrs World 2022: जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सरगम कौशलने (Sargam Koushal) मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला आहे. 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीयाने हे विजेतेपद पटकावले आहे.
2001 मध्ये अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकर ने विजेतेपद पटकावले होते. मिसेस वर्ल्ड 2022 कार्यक्रम शनिवारी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांच्या हस्ते सरगम कौशल ला मुकुट घातला गेला.
मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले आणि त्यानंतर मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, मिसेस इंडिया स्पर्धेने रविवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर विजेत्याची घोषणा केली. पोस्टची घोषणा करताना लिहिले होते, ‘दीर्घ प्रतीक्षा संपली, २१ वर्षांनंतर आम्हाला मुकुट परत मिळाला!’
View this post on Instagram
सरगमने मुकुट जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला
मिसेस वर्ल्ड झाल्यानंतर सरगम कौशल म्हणाली, ‘आम्हाला (भारताला) २१-२२ वर्षांनंतर ताज परत मिळाला आहे. मी खूप उत्सुक आहे. भारतावर प्रेम करा, जगावर प्रेम करा.
मिसेस वर्ल्ड 2022 मधील ज्युरी पॅनल मध्ये सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचाही त्यात समावेश होता.